Upcoming Oppo Reno 7 Mobile: ट्रिपल कॅमेरा सेटअपसह Oppo Reno 7 सीरिज लाँच, किंमत आणि वैशिष्ट्ये जाणून घ्या
Oppo Reno 7 (Photo Credit - Twitter)

दीर्घकाळ चालणाऱ्या अफवा आणि अधिकृत घोषणेनंतर, Oppo Reno 7 सीरिज अखेर चीनमध्ये आली आहे. अपेक्षेप्रमाणे या सीरिजमध्ये तीन फोन आहेत. Reno 7, Reno 7 Pro, आणि, पहिल्यांदाच, Reno 7 SE, जे Pro+ जागा घेते. नवीन Reno 7 फोन त्याच्या आधीच्या जनरेशनच्या मॉडेल्सपेक्षा वेगळा नसून तो पॉवर चिपसेट आणि उत्तम कॅमेरासह सादर करण्यात आला आहे. Oppo Reno 7-सीरीज फोन MediaTek आणि Qualcomm चिपसेटच्या कॉम्बोसह येतात जे वेगवेगळ्या किंमतीत आहे. Reno 7 सीरीजचे लॉन्चिंग सध्या चीनमध्ये करण्यात आले आहे परंतु असे वृत्त आहे की Oppo पुढील वर्षी भारतात किमान दोन Reno 7 सीरीज फोन लॉच करण्याचा विचार करत आहे. जे Reno 7 आणि Reno 7 Pro असू शकतात जे 2022 च्या पहिल्या महिन्यात भारतात लॉच केले जाऊ शकतात. मिळालेल्या माहितीनुसार Reno 7 SE भारतात कधीही लॉच होणार नाही परंतु Oppo याची काही शाश्वती देत नाही.

Oppo Reno 7, Reno 7 Pro आणि Reno 7 SE स्पेसिफिकेशन

Oppo Reno 7 आणि Reno 7 SE ची स्क्रीन 6.43-इंच आहे. दोन्ही फोन 90Hz रेट आणि 180Hz च्या कमाल टच सॅम्पलिंग रेटसह फुल-HD+ AMOLED डिस्प्लेला सपोर्ट करतात. तसेच, Reno 7 ची स्क्रीन-टू-बॉडी 91.7 टक्के आहे, तर Reno 7 SE ची 90.8 टक्के आहे. दोन्ही डिस्प्ले  कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 5 सेफ्टीसह येतात. दोन्ही फोनची बॅटरी देखील 4500mAh आहे, परंतु Reno 7 60W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते, तर Reno 7 SE मध्ये 33W चार्जिंग सपोर्ट आहे. दोन्ही फोन Android 11-आधारित ColorOS 12 चालवतात. Reno 7 मध्ये Qualcomm Snapdragon 778G प्रोसेसर वापरण्यात आला आहे, तर Reno 7 SE मध्ये MediaTek Dimensity 900 SoC आहे. (हे ही वाचा Upcoming Redmi Mobile: शाओमीच्या रेडमीने केला वॉटरप्रूफ मोबाईल लाँच, पहा वैशिष्ट्ये आणि किंमत.)

Reno 7 मध्ये 64-मेगापिक्सलचा प्राइमरी कॅमेरा, 8-मेगापिक्सलचा वाइड-एंगल कॅमेरा आणि 2-मेगापिक्सेलचा मॅक्रो कॅमेरा आहे. दुसरीकडे, Reno 7 SE मॅक्रो आणि पोर्ट्रेट फोटोग्राफीसाठी 48-मेगापिक्सेलचा प्राइमरी कॅमेरा आणि 2-मेगापिक्सेल सहायक कॅमेरे पॅक करतो. सेल्फी स्नॅपर्स देखील भिन्न आहेत, जेथे Reno 7 मध्ये 32-मेगापिक्सेल कॅमेरा आहे, तर Reno 7 SE मध्ये 16-मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा आहे.

Oppo Reno 7, Reno 7 Pro आणि Reno 7 SEच्या किंमती

Oppo Reno 7 च्या 8GB RAM आणि 128GB स्टोरेज किंमत CNY 2,699 आहे. तसेच त्याच्या 8GB RAM आणि 256GB किंमत CNY 2,999 आहे आणि 12GB RAM आणि 256GB अंतर्गत स्टोरेज मॉडेलची किंमत CNY 3,299 आहे. हे मॉर्निंग गोल्ड, स्टाररी नाईट ब्लॅक आणि स्टार रेन वॉश रंगांमध्ये येतो.

Oppo Reno 7 Pro 8GB RAM आणि 256GB स्टोरेज किंमत CNY 3,699 आहे तर 12GB RAM आणि 256GB स्टोरेज किंमत CNY 3,999 आहे. हा फोन Mu Xuejin, Starry Night Black आणि Star Rain Wash या रंगांमध्ये येतो.

Oppo Reno 7 SE च्या 8GB RAM आणि 128GB स्टोरेज किंमत CNY 2,199 आहे तर त्याच्या 8GB RAM आणि 256GB स्टोरेज किंमत CNY 2,399 आहे. हे मॉर्निंग गोल्ड, मून नाईट ब्लॅक आणि स्टार रेन वॉश रंगांमध्ये येतो.