Lava Z1 येत्या 5 फेब्रुवारीपासून Amazon वर विक्रीसाठी होणार उपलब्ध, जाणून घ्या सविस्तर
Lava Z1 (Photo Credits: Twitter)

स्मार्टफोन निर्माता कंपनी लावा (Lava) लवकरच आपला नवा स्मार्टफोन Lava Z1 भारतात विक्रीसाठी उपलब्ध करणार आहे. येत्या 5 फेब्रुवारीपासून हा स्मार्टफोन ऑनलाईन शॉपिंग साइट अॅमेजॉन इंडियावर विक्रीसाठी उपलब्ध होईल. अलीकडेच लावा ने Z सीरिजचे 3 स्मार्टफोन लाँच केले होते. यात आता लावा Z1 स्मार्टफोनची विक्री 5 फेब्रुवारीपासून सुरु केली जाईल. अॅमेजॉन इंडियावर (Amazon India) या स्मार्टफोनची विक्री होईल.

लावा Z1 अॅमेजॉन इंडियावर निळ्या आणि लाल रंगात उपलब्ध असेल. सध्या हा फोन Lavamobiles.com वर विक्रीसाठी उपलब्ध आहे. या स्मार्टफोनची किंमत 5,499 रुपये आहे. मात्र लावाच्या अधिकृत साइटवर हा स्मार्टफोन 4,999 रुपयांना मिळत आहे. ही ऑफर 28 फेब्रुवारी पर्यंत वैध असेल.

Lava Z1 डिस्प्ले

या फोनमध्ये 5 इंचाचा डिस्प्ले देण्यात आला आहे ज्याच्या सुरक्षेसाठी कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 3 प्रोटेक्शन दिले गेले आहे.हेदेखील वाचा-Brand Finance Global 500: Reliance Jio चे मोठे यश; Apple, Amazon ला मागे टाकून बनला जगातील 5 वा ताकदवान ब्रँड

Lava Z1 स्टोरेज

या फोनमध्ये 1.8 गिगाहर्ट्ज क्वाड-कोर मिडियाटेक हेलिओ A20 प्रोसेसर, 2GB रॅम आणि 16GB इनबिल्ट स्टोरेज देण्यात आले आहे. फोनचे स्टोरेज मायक्रो एसडी कार्डच्या साहाय्याने 256GB पर्यंत वाढवले जाऊ शकते.

Lava Z1 कॅमेरा

या फोनमध्ये अपर्चर f/2.2 सह 5MP चा रियर कॅमेरा देण्यात आला आहे जो एलईडी फ्लॅशसह येतो. सेल्फी आणि व्हिडिओसाठी अपर्चर f/2.2सह 5MP चा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

Lava Z1 कनेक्टीव्हिटी आणि बॅटरी

या फोनमध्ये 3100mAh ची बॅटरी दिली गेली आहे, हा अॅनड्रॉईड 10 गो एडिशन बेस्ड XOS 6.2 वर चालतो. कनेक्टिव्हिटीसाठी यात ड्यूल 4G VoLTE, वायफाय 802.11 b/g/n, ब्लूटुथ 5.0, जीपीएस आणि मायक्रो युएसबी सारखे फीचर्स आहेत. याचे डायमेंशन 145.1X73.3X10.26 mm इतके आहे.

अलीकडेच लावा ने आपल्या BeFit या फिटनेस बँडची भारतात घोषणा केली होती. या स्मार्टबँडमध्ये आकर्षक वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत. या स्मार्टबँडमध्ये अनेक आकर्षक फिचर्स देण्यात आली आहेत. याच्या डिझाईनविषयी बोलायचे झाले तर, यात आयताकृती कलर्ड स्क्रीन देण्यात आली आहे. याच्या खालच्या बाजूस एक कपॅसिटीव बटण असेल. याच्या स्क्रीनवर यूजर्सला स्टेप काउंट, टाइम, बॉडी टेम्परेचर इत्यादींविषयी माहिती मिळेल.