JioPhone 5G (PC- BurnerBits @burner_bits/twitter)

JioPhone 5G बद्दल अनेक दिवसांपासून बातम्या येत आहेत आणि वापरकर्ते या स्मार्टफोनची आतुरतेने वाट पाहत आहेत. रिपोर्ट्सनुसार, हा कंपनीचा सर्वात स्वस्त 5G फोन असेल आणि त्यात अनेक खास फीचर्स असतील. कंपनीने गेल्या वर्षी आपला स्वस्त Android फोन JioPhone Next बाजारात लॉन्च केला होता. ज्यासाठी कंपनीने Google सोबत भागीदारी केली होती. (Reliance Jio) स्वस्त अँड्रॉइड फोननंतर आता कंपनी 5G फोन आणत आहे, जो कमी किमतीत दिला जाईल.

अँड्रॉइड सेंट्रलच्या रिपोर्टनुसार, JioPhone 5G बाजारात 9,000 ते 12,000 रुपयांच्या किमतीत लॉन्च केला जाऊ शकतो. तसेच काही लीक्समध्ये असेही सांगण्यात आले आहे की, JioPhone 5G ची किंमत 10,000 रुपयांपेक्षा कमी असू शकते. एवढेचं नाही तर JioPhone 5G सह वापरकर्त्यांना JioPhone Next सारख्या काही वित्तपुरवठा पर्यायांची सुविधा देखील मिळेल, ज्यानंतर स्मार्टफोनची किंमत मोठ्या प्रमाणात कमी होईल. (वाचा - 5G in India: लवकरच Internet चा स्पीड वाढणार; देशात 2022-23 मध्ये सुरु होणार 5 जी सेवा)

JioPhone 5G फीचर्स -

JioPhone 5G Android 11 Go Edition वर आधारित असेल आणि त्यात 6.5-इंचाचा डिस्प्ले दिला जाऊ शकतो. त्याची स्क्रीन रिझोल्यूशन 720×1,600 पिक्सेल असेल आणि वापरकर्ते 4GB रॅमसह 32GB अंतर्गत स्टोरेज मिळवू शकतात. हा स्मार्टफोन ऑक्टा-कोर क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 480 प्रोसेसरवर दिला जाऊ शकतो आणि पॉवर बॅकअपसाठी 5,000mAh बॅटरी दिली जाऊ शकते, जी 18W फास्ट चार्जिंग सपोर्टसह येईल.

फोटोग्राफीसाठी JioPhone 5G स्मार्टफोनमध्ये ड्युअल रियर कॅमेरा मिळू शकतो. रिपोर्ट्सनुसार, यामध्ये 13MP चा प्राइमरी सेन्सर दिला जाईल, तर दुय्यम सेन्सर 2MP चा असेल. त्याच वेळी, वापरकर्ते व्हिडिओ कॉलिंग आणि सेल्फीसाठी 8MP फ्रंट कॅमेरा मिळवू शकतात. फोनमध्ये MyJio, JioTV आणि JioSaavn च्या प्रीलोडेड अॅप्सची सुविधा देखील असेल.