रिलायंस कंपनी दरवर्षी त्यांच्या वार्षिक सभेमध्ये एक प्रॉडक्ट लॉन्च करते. यंदा RIL AGM 2020 मध्ये रिलायंस कंपनी कडून जिओ ग्लासेस (Jio Glass) लॉन्च करण्यात आले आहेत. दरम्यान यंदा कोरोना संकट काळात ही सभा व्हर्च्युअली पार पडत आहे. यामध्येच रिलायंस कडून जिओ ग्लासचा डेमो देखील देण्यात आला आहे. जिओ ग्लास एक मिक्स्ड रिअॅलिटी (Mixed Reality Cloud in Real-Time) स्मार्ट ग्लास आहेत. ज्याच्या मदतीने व्हिडिओ कॉलिंग (Video Calling) ते शैक्षणिक अभ्यास अशा अनेक गोष्टी करता येणार आहे. जिओ ग्लासमध्ये व्हर्च्युअल असिस्टंटचादेखील सपोर्ट असेल. दरम्यान जिओ ग्लास हे प्रामुख्याने होलोग्राम कंटेन्ट साठी बाजारात आणला आहे. RIL AGM 2020: जिओ प्लॅटफॉर्म मध्ये आता Google ची देखील गुंतवणूक; 5G solution, JioGlass सह या मोठ्या घोषणा.
जिओ ग्लास ची वैशिष्ट्यं
- जिओ ग्लासचं वजन अवघं 75 ग्राम आहे.
- जिओ ग्लास 3डी, 2 डी दोन्हीला सपोर्ट करणार
- जिओ ग्लासच्या व्हिडिओ कॉलमध्ये समोरची व्यक्ती 3 डी अवतारमध्ये दिसू शकतात.
- एका केबलच्या मदतीने ग्लास आणि स्मार्टफोन मधील माहितीचा वापर केला जाऊ शकतो.
- जिओ ग्लासला 25 अॅप्स सपोर्ट करू शकणार
- जिओ ग्लासचा वापर ई क्लासमध्ये होलोग्राफिक्स कंटेंट पाहण्यासाठी केला जाऊ शकतो. म्हणजेच भूगोलाचा अभ्यास करताना आता विश्व तुमच्या डोळ्यासमोर आणण्याची क्षमता त्यामध्ये आहे.
- अद्याप जिओ ग्लासची किंमत गुलदस्तामधेच ठेवण्यात आली आहे.
आजच्या 43व्या सभेमध्ये रिलायंस कडून अन्य देखील मोठ्या घोषणा केल्या आहेत. त्यामध्ये जिओची गूगल सोबत असलेली पार्टनरशीप, व्हॉट्सअॅप सोबत येऊन लॉन्च केला जाणार जिओ मार्ट हा प्रकल्प आहे. यासोबत ओटीटी प्लॅटफॉर्मसाठी जिओ टीव्ही प्लसची घोषणा केली आहे. दरम्यान 5जी देखील भारतामध्ये स्वदेशी स्वरूपात घेऊन येण्याचा मानस व्यक्त केला आहे.