Instagram Down: व्हॉट्सअॅपनंतर आता इन्स्टाग्राम ठप्प; ट्विटरवर ट्रेंड
Instagram Down (File Image)

Instagram Down: गुरुवारी दुपारी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्राम (Instagram) अचानक डाउन (Down) झाल्यामुळे यूजर्सना अडचणींचा सामना करावा लागला. मेटाच्या फोटो आणि व्हिडिओ शेअरिंग प्लॅटफॉर्म इन्स्टाग्राम डाऊनचा परिणाम जगभरात दिसून आला. तत्पूर्वी, इन्स्टंट मेसेजिंग अॅप व्हॉट्स अॅपही बुधवारी रात्री उशिरा अचानक बंद झाले. यामुळे, वापरकर्ते संदेश पाठवू किंवा प्राप्त करण्यास सक्षम नव्हते.

ट्विटरवरील काही युजर्सनी याबाबत माहिती दिली. यानंतर ट्विटरवर #Instagramdown ट्रेंड होऊ लागला. या हॅशटॅगवर ट्विट करून लोकांनी इंस्टाग्राम डाऊन झाल्याची माहिती दिली. आउटेज ट्रॅकिंग वेबसाइट डाउन डिटेक्टरने इंस्टाग्राम डाऊन झाल्याची माहिती दिली आहे. प्रत्यक्षात दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास सोशल मीडिया प्लॅटफॉर्म डाऊन झाला. यानंतर लोकांनी याबद्दल तक्रार करण्यास सुरुवात केली. (हेही वाचा - Google Bard New Features: गुगल बार्डमध्ये नवीन फिचर अॅड; आता तुम्ही ऐकू शकता तुमच्या प्रश्नांची उत्तरे)

भारतातील अनेकांनी इन्स्टाग्रामच्या डाऊन डिटेक्टरबद्दल माहिती दिली. अॅप डाऊन झाल्यामुळे यूजर्सना अनेक समस्यांना सामोरे जावे लागले. तर 36 टक्के लोक असे होते, ज्यांना सर्व्हर कनेक्शनशी संबंधित अडचणींचा सामना करावा लागला. त्याच वेळी, 22 टक्के लोकांनी सांगितले की, त्यांना लॉगिनशी संबंधित समस्यांना सामोरे जावे लागले.

इन्स्टाग्रामवर युजर्सना समस्या येण्याची ही पहिलीच वेळ नाही. 11 जुलैलाही व्हॉट्सअॅप, इन्स्टाग्राम आणि फेसबुकचे सर्व्हर डाउन होते. आता काही दिवसांतच इन्स्टाग्राम डाऊन झाले आहे. व्हॉट्सअॅप डाउनची समस्या भारतीय वेळेनुसार पहाटे 1.33 वाजता सुरू झाली. यामुळे युजर्संना मेसेज पाठवण्यात अडचणींचा सामना करावा लागला.