Instagram New Features: तुमचीच मर्जी! इन्स्टाग्राम मेसेज आता खुशाल करा एडीट किंवा पिन; दोन नवे चॅट फीचर्स लॉन्च, घ्या जाणून
Instagram (PC - pixabay)

इन्स्टाग्रामने आता चॅटिंगसाठी दोन नवीन फीचर्स (Instagram Message Edit Feature) दिले आहेत. यूजर्सना आता व्हॉट्सअ‍ॅप प्रमाणे इन्स्टाग्रामचे मेसेजही एडिट करता येणार आहेत. इन्स्टाग्रामने आपल्या एक्स हँडलवरुन याबाबत माहिती दिली आहे. या वर्षाचे दोन महिने कमी झाले आहेत, मात्र इन्स्टाग्राममध्ये दोन नवे फीचर्स जोडले गेले आहेत; अशा आशयाची पोस्ट इन्स्टाग्रामने केली आहे. मेसेज एडिट करण्यासोबतच, चॅट्स पिन करण्याची सुविधाही इन्स्टा देणार आहे. (हेही वाचा - Instagram Message Feature: इन्स्टाग्रामवर 'या' फीचरमुळं चुकिचा संदेश पाठवल्याची चुक सुधारता येणार)

यूजर्सना आता चुकीचा मेसेज एडिट करता येणार आहे. मेसेज पाठवून 15 मिनिटांपेक्षा अधिक वेळ झाला असेल, तर तो एडिट करता येणार नाही. यासोबतच यूजर्सना आपले फेव्हरेट किंवा महत्त्वाचे तीन चॅट्स 'पिन' करता येणार आहेत. यामुळे हे तीन चॅट्स कायम सर्वात वरती राहतील, आणि तुमचे महत्त्वाचे मेसेज मिस होणार नाहीत.

यासोबतच व्हॉट्सअ‍ॅपवर असणारे 'टर्न ऑफ रीड रिसिप्ट्स' , सेव्ह फेव्हरेट स्टिकर्स , रिप्लाय टेक्स्ट विथ GIF, फोटो किंवा व्हिडिओ असे फीचर्सही इन्स्टाग्रामवर देण्यात आले आहेत. यामुळे इन्स्टावर चॅटिंगची मजा आणखी वाढणार आहे.