पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या 'आत्मनिर्भर भारत' हाकेनंतर आता भारतीय लष्कराने (Indian Army) सोपे आणि सुरक्षित मेसेजिंग अॅप विकसित केले आहे. या अॅपच नाव Secure Application for Internet (SAI)आहे. यामध्ये एंड टू एंड सिक्युअर व्हॉईस, इंटरनेटच्या माध्यमातून अॅन्ड्राईडवर टेक्स्ट आणि व्हिडिओ कॉलिंग सेवा देखील आहे. हे अॅप अगदीच स्ध्या लोकप्रिय असलेल्या मॅसेजिंग अॅप व्हॉट्सअॅप, टेलिग्राम, संवाद आणि GIMS प्रमाणे आहे. यामध्येदेखील एंड टू एंड Encryption Messaging Protocol आहे. सुरक्षेच्या दृष्टीनेदेखील हे अॅप उत्तम आहे.
सध्या केवळ अॅन्ड्रॉईड प्रणालीमध्ये सुरू असणारे हे अॅप लवकरच iOS platform वर देखिल उपलब्ध करून देण्याचं काम सुरू आहे. दरम्यान हे Secure Application for Internet (SAI) अॅप आर्मीमध्ये सर्वत्र सुरक्षित मेसेज पोहचवण्यासाठी वापरलं जाणार आहे. शासकीय अधिकाऱ्यांसह 20 देशातील सैनिकांच्या WhatsApp ची झाली हेरगिरी: रिपोर्ट.
ANI Tweet
Indian Army has developed a simple and secure messaging application named the 'Secure Application for Internet (SAI)'. The application supports end to end secure voice, text & video calling services for Android platform over internet: Ministry of Defence
— ANI (@ANI) October 29, 2020
दरम्यान भारताचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी देखील Secure Application for Internet (SAI)अॅप पाहिले आहे. त्याची काम करण्याची पद्धती पाहून Col Sai Shankar यांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली आहे. अॅप बनवण्यासाठी त्यांनी वापरलेल्या कौशल्याचं कौतुक केले आहे.