Indeed Layoffs Representational Image (Photo Credit: Wikimedia Commons, Pexels)

Indeed Layoffs: अमेरिकन जॉब सर्च फर्म इनडीडने (Indeed) आपल्या सुमारे 8% कर्मचाऱ्यांची नोकर कपात जाहीर केली आहे. रिपोर्ट्सनुसार, गेल्या दोन वर्षांत कंपनी दुसऱ्यांदा कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार आहे. टाळेबंदीचा अमेरिकन कामगारांवर मोठ्या प्रमाणावर परिणाम होईल. अहवालानुसार, कंपनी साधारण 1,000 लोकांना कामावरून काढून टाकणार आहे. संस्थेचे सरलीकरण करण्याची ही नोकर कपात केली जात असल्याचे कंपनीने सांगितले. सीईओ ख्रिस हायम्स यांनी प्रभावित कर्मचाऱ्यांसाठी एक संदेश जारी करत, हा एक कठीण निर्णय असल्याचे म्हटले. तसेच गेल्या वर्षीच्या जागतिक मंदीमुळे विक्रीत घट झाल्यामुळे कंपनी अजूनही वाढीसाठी तयार झालेली नसल्याचेही सांगितले.

ते म्हणाले की, टाळेबंदीच्या माध्यमातून आमचे कर्मचारी कमी करण्याचा कठीण निर्णय घेतल्याची बातमी सांगताना मला वाईट वाटत आहे. मागील वर्षी कर्मचाऱ्यांच्या संख्येत घट झाल्यामुळे खर्चात बचत झाली होती, परंतु यावर्षी संघटना आणि संघाच्या फायद्यासाठी कंपनी कर्मचाऱ्यांना कमी करणार आहे. या टाळेबंदीद्वारे, कंपनी ‘अनेक संस्थात्मक स्तर’ कमी करण्याचे उद्दिष्ट ठेवत आहे.

ख्रिस हायम्स यांनी आश्वासन दिले की, नोकऱ्यांमध्ये कपात फक्त अमेरिकेपुरतीच मर्यादित राहील. टाळेबंदीचा परिणाम प्रामुख्याने रिसर्च आणि डेव्हलपमेंट, गो-टू-मार्केट संघांवर होणार आहे. आपला निर्णय जाहीर केल्यानंतर सीईओ ख्रिस हायम्स यांनी प्रभावित लोकांना नोकऱ्या मिळवून देण्याच्या कंपनीच्या ध्येयाचा पुनरुच्चार केला आणि त्यांच्या चांगल्या भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. यूके, आयर्लंड आणि ऑस्ट्रेलिया सारख्या देशांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांवरही या टाळेबंदीच्या निर्णयाचा परिणाम होईल की नाही हे लवकरच समजेल. (हेही वाचा: Walmart Layoffs: वॉलमार्टमध्ये पुन्हा एकदा मोठी नोकरकपात; शेकडो कर्मचाऱ्यांना कामावरून काढले जाणार- Reports)

हायम्स म्हणाले की, टाळेबंदीमुळे संस्था सुलभ करण्यात आणि संघ म्हणून प्रभावीपणे काम करण्यात मदत होईल. तसेच महसूल वाढ पुन्हा सुरू होईल आणि 2030 पर्यंत 100 दशलक्ष लोकांसाठी नोकऱ्या निर्माण करण्यात मदत करण्याच्या, कंपनीच्या उद्दिष्टापर्यंत पोहोचण्यासाठी हे एक महत्वाचे पाऊल ठरेल. लोकांना नोकऱ्या सोडून जाताना पाहणे हे अवघड असल्याचेही हायम्स म्हणाले. एखाद्या व्यक्तीच्या जीवनातील नोकरीचे काय आहे महत्त्व आहे हे आपल्याला माहीत असण्यावर त्यांनी भर दिला.