Google 3D Animals ला कंटाळला असाल तर ट्राय करा Toontastic 3D Cartoon App, अफलातून गेम्सच्या माध्यमातून बनवा स्वत: अॅनिमेटेड कार्टून्स
Toontastic 3D (Photo Credits: PlayStore)

लॉकडाऊनच्या (Lockdown)  काळात घरबसल्या लोकांना काय काय करता येईल याबाबत कला, क्रिडा, सोशल मिडिया च्या माध्यमातून वेगवेगळे सल्ले दिले जात आहे. लॉकडाऊनच्या काळात सर्वात कठीण झालं आहे ते लहान मुलांसाठी. त्यांना घरात कसे रमवता येईल यासाठी पालक वेगवेगळी शक्कल शोधून काढत आहे. यात कालपासून गुगल 3D Animals (Google 3D Animals) हा नवा पर्याय त्यांनी शोधून काढला आहे. यात बच्चे कंपनीला वेगवेगळ्या प्राण्यांशी प्रत्यक्ष समोर असल्याचे भासवून त्यांचीशी बोलू शकतात. मात्र याला देखील तुमची मुलं किंवा तुम्ही कंटाळला असाल हा तर Toontastic 3D Cartoon App तुम्ही ट्राय करू शकता. या अॅपमध्ये वेगवेगळे कार्टून गेम्स आहेत ज्यात तुम्ही स्वत: अॅनिमेटेट कार्टून्स बनून हे गेम्स खेळू शकता.

गुगल 3D अॅनिमल्स या फिचरमध्ये बच्चे कंपनी छान रमून गेली आहे. ज्यात तुम्हाला वाघ, सिंह, पांडा, शार्क सारखे प्राणी तसेच पक्षी आजूबाजूला असल्याचा भास होत आहे. त्यात भर म्हणून लहान मुलांना कार्टून्सच्या माध्यमातून मुलांचे मनोरंजन करण्यासाठी टूंटास्टिक 3D कार्टून अॅप आला आहे. ज्यात तुम्हाला कार्टून्सच्या माध्यमातून गेम्स तसेच छान छान गोष्टीही शिकू शकतात.

सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे यात तुम्ही स्वत:चे अॅनिमेटेड कार्टून बनवून गेम खेळू शकतात. 6 ते 12 वयोगटातील मुलांसाठी हे अॅप तयार करण्यात आले आहे. Google 3D Animals: Tiger, Giant Panda, Lion यांच्यासह विविध प्राणी-पक्षी क्वारंटाइनच्या काळात 3D इफेक्टमध्ये तुमच्या भेटीला!

कसा कराल या अॅपचा वापर:

सर्वात आधी तुम्हाला तुमची स्टोरी निवडा आणि त्यानंतर त्यांनी बनवलेल्या पात्रात तुमचा चेहरा लावून गेमला सुरुवात करा आणि ते रेकॉर्ड करा. त्यांनी 8 प्रकारचे पात्र तयार केले आहेत. त्यात तुम्हाला आवडेल ते पात्र निवडा आणि स्वत:चे चित्र तयार करा. यात तुम्ही तुमचा आवाजही देऊ शकता.

Toontastic 3D अॅपचा वापर करुन तुम्ही तुमच्या साहसी गोष्टी तयार करु शकतात. हे करण्यात एक वेगळीच मजा आहे. तुम्ही निवडलेले पात्र हे तुमच्या मोबाईल स्क्रीन वर छान फिरताना, पळताना दिसेल. ज्यात तुमची मुले ही या गोष्टीचा आनंद घेतील. हे अॅप Android आणि iOS या दोन्ही यूजर्संनामोफत डाऊनलोड करता येईल.