फेसबुकने (FaceBook) करोडो युजर्सचे पासवर्ड इंटर्नली लिक केले आहेत. म्हणजेच कंपनीने पासवर्ड प्लेन टेक्स्टमध्ये स्टोर केले आहेत. कर्ब्स सिक्योरिटी यांच्या मते, अशा पद्धतीने पासवर्ड वर्षभर लिक केले गेले. त्यामुळे कंपनीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना युजर्सचे पासवर्ड मिळणे सहज शक्य होते. खरंतर पासवर्ड्सला एन्क्रिप्शनसह प्रोटेक्ट केले जातात.
परंतु कंपनीने स्टोर केलेल्या पासवर्डमुळे त्याचा युजर्सला वेगळा फायदा होणार का असे अद्याप सांगू शकत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. तर 200 ते 600 मिलियन फेसबुक युजर्स यामुळे प्रभावित आहेत. फेसबुकने असे सांगितले आहे की, प्रभावित युजर्सला नोटिफिकेशन पाठवून पासवर्ड बदलण्यास सांगण्यात येत आहे. यापूर्वी कर्ब्सने त्यांच्या रिपोर्ट्समध्ये असे लिहिले होते की, Keeping Password Secure हेडलाईनसह मुख्य पोस्ट केली होती. त्यामध्ये त्यांनी फेसबुक कंपनीने युजर्सचे पासवर्ड प्लेन टेक्स्ट केले असल्याचे स्पष्ट केले होते.
तसेच फेसबुकच्या मते लाईट युजर्स आणि फेसबुक युजर्स यामुळे प्रभावित आहेत. यामधीलच युजर्सच प्लेन टेक्स्ट मध्ये सहभागी आहेत.एवढेच नसून 10 हजारपेक्षा इंन्स्टाग्राम युजर्स प्रभावित आहेत. यामधील मुख्य धोक्याची गोष्ट म्हणजे 20 हजार पेक्षा जास्त कर्मचारी युजर्सचे पासवर्ड सर्च करु शकतात.