वाय फाय शिवाय घेऊ शकता स्मार्टफोनचा डेटा बॅकअप ; या आहेत '4' सोप्या स्टेप्स
प्रतिकात्मक फोटो (Photo Credit: GSMarena.com)

गुगल ड्राईव्हवर मॅन्युअल बॅकअप घेण्यासाठी लवकरच गुगलचे एक नवे फिचर येणार आहे. यासाठी युजरला वाय-फाय कनेक्टिव्हीटीची गरज पडणार नाही. यापूर्वी युजरला बॅकअप घेण्यासाठी वाय-फाय आणि फोन चार्ज असणे गरजेचे होते. त्याशिवाय डेटा बॅकअप घेणे शक्य नव्हते. मात्र गुगलने एक नवे फिचर लॉन्च केले आहे. याच्या मदतीने तुम्ही वाय फायशिवाय फक्त मोबाईल नेटवर्कच्या मदतीने डेटा बॅकअप घेणे शक्य होणार आहे.

हे फिचर सर्वात प्रथम ट्विटर युजर एलेक्स क्रूगरने पाहिले. एलेक्स क्रूगरने ट्विट करुन सांगितले की, अॅनरॉईड डिव्हाईसमध्ये 'बॅकअप नाओ' चा ऑप्शन किंवा बटण देण्यात येईल. हे फिचर हळूहळू दिसण्यास सुरुवात होईल. हे फिचर अॅनरॉईड मार्शमॅलोवर काम करणाऱ्या स्मार्टफोन्ससाठी सादर करण्यात आले आहे. हे फिचर वाय-फाय ऐवजी मोबाईल नेटवर्कवर काम करेल. याचा अर्थ युजर्स मोबाईल नेटवर्कच्या साहाय्याने फोनचे डेटा बॅकअप घेऊ शकतील. सध्या हे फिचर Pixel 2 आणि जुन्या Droid Turbo स्मार्टफोन ( जे अॅनरॉईड मार्शमॅलोवर काम करतं) मध्ये देण्यात आले आहे.

मॅन्युअल डेटा बॅकअप घेण्याची पद्धत :

- यासाठी सर्वात आधी अॅनरॉईड फोनच्या सेटिंग्समध्ये जा.

- त्यानंतर गुगलवर टॅप करुन बॅकअपवर क्लिक करा.

- त्यानंतर Back up to Google Drive टॅप करा.

- असे केल्याने तुमच्या फोनमधील सर्व अॅप्स आणि डेटा फोनमध्ये सेव्ह होईल.

- हे फिचर अॅनरॉईड युजर्ससाठी रोलआऊट केले जात आहे. हे फिचर मार्शमॅलो किंवा त्यावरील व्हर्जनवर काम करणाऱ्या स्मार्टफोन्समध्ये काम करेल.

युजर्ससाठी हे फिचर अत्यंत कामाचे आहे. त्यामुळे डेटा बॅकअपचे काम करणे सोपे होणार आहे. तसंच वाय फायची गरज नसल्याने कुठेही बसून तुम्ही डेटा बॅकअप घेऊ शकता.