आजकाल व्हॉट्सअॅपशिवाय राहणं हे अनेकांसाठी अशक्य झाले. अगदी मेसेज पाठवण्यापासून ते बिझनेस अकाऊंटपर्यंत अनेक सोयी आता व्हॉट्सअॅपवर सुरू झाल्या आहेत. जगातील कोणत्याही कोपर्यातील लोकांना एका क्लिकवर कनेक्ट व्हॉट्सअॅप तरूणांमध्ये फारच लोकप्रिय आहे. भारतात व्हॉट्सअॅपचे सुमारे 20 कोटींपेक्षा अधिक अॅक्टिव्ह युजर्स आहेत. मात्र प्रगत टेक्नोलॉजीबरोबर त्याचे फायदे जसजसे वाढतात तसेच काही जण त्याचा दुरूपयोगदेखील करू शकतात.
काही नावडत्या किंवा उपद्रवी युजर्सपासून सुटका मिळवण्यासाठी अनेकजण अकाऊंट ब्लॉक करतात. यामुळे समोरच्या व्यक्तीशी संपर्क करणं त्याचं स्टेट्स पाहणं, स्टोरी, डीपी पाहणं यापासून त्या व्यक्ती दूर ठेवल्या जातात. कोणाच्या कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये तुमचं नावदेखील ब्लॉक लिस्टमध्ये असेल तर स्वतःला अनब्लॉक कसं कराल ? हे देखील नक्की जाणून घ्या.
तुम्हांला ब्लॉक केलंय याची खात्री करा
समोरच्या व्यक्तीने तुम्हांला खरंच ब्लॉक केलंय का? हे एकदा तपासून घ्यायला विसरू नका. समोरच्या व्यक्तीचं लास्ट सीन, व्हॉट्सअॅप स्टेट्स, प्रोफाईल पिक्चर दिसत नसेल तर तुम्हाला ब्लॉक केलंय असं समजा. समोरच्या व्यक्तीला मेसेज केल्यानंतर केवळ एक टीक दिसत असेल तर तुम्हांला ब्लॉक केल्याचं समजा.
अनब्लॉक कसं कराल ?
व्हॉट्सअॅप ओपन करा. त्याच्या सेटिंगमध्ये जा. त्यानंतर व्हॉट्सअॅप अकाऊंट डिलिट करा.
व्हॉट्स अकाऊंट डिलीट करण्यासाठी 'डिलिट माय अकाऊंट' वर क्लिक करा. त्यानंतर तुमचा नंबर एन्टर करा.
नंबर एन्टर केल्यानंतर तुमचं अकाऊंट डिलीट करा.
अनइन्स्टॉल केल्यानंतर फोन रिस्टार्ट करा.
प्ले स्टोरमध्ये गेल्यानंतर पुन्हा व्हॉट्स अॅप इन्स्टॉल करा. त्यानंतर तुमचे सारे डिटेल्स त्यामध्ये भरावेत.
आता तुम्ही समोरच्या व्यक्तीच्या व्हॉट्सअॅप अकाऊंटमधून अनब्लॉक झालेले असाल.