प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credit: unian.net)
आजकल सर्वजण आपल्या आठवणी मित्रपरिवारासोबत शेअर करण्यासाठी इंस्टाग्रामचा फार मोठ्या प्रमाणात वापर करतात. काही वेळा असे होते की, युजर्सकडून एखाद्या कारणावरुन पोस्ट डिलिट होते. परंतु चुकून पोस्ट डिलिट झाल्यास तर चिंता करु नका. कारण आम्ही तुम्हाला एक खास ट्रिक सांगणार आहोत. त्याच्या मदतीने तुम्ही इंस्टाग्राम पोस्ट रिकव्हर करु शकता.(Google Maps, Gmail, YouTube आजपासून 'या' स्मार्टफोन मध्ये बंद; इथे पहा यादी)
इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर करणे किंवा त्याच्या माध्यमातून एकमेकांसोबत जोडले जाता येतेच. तसेच एकमेकांचे फोटो किंवा व्हिडिओ सुद्धा आपल्याला पहायला मिळतात. परंतु तुमची डिलिट झालेली पोस्ट रिकव्हर करायची असेल तर फक्त काही सोप्प्या ट्रिक्सचा वापर करावा लागणार आहे.
-डिलिट झालेली पोस्ट रिकव्हर करण्यासाठी प्रथम इंस्टाग्राम सुरु करा
-आता तुमच्या प्रोफाइलवर जा
-येथे तुम्हाला उजव्या बाजूला तीन लाइनचे ऑप्शन दिसून येईल त्यावर क्लिक करा -आता Recently Deleted ऑप्शन मिळेल. जर तो ऑप्शन तुम्हाला दिसत नसेल तर सर्च बॉक्समध्ये जाऊन ते सर्च करा.
-येथे तुम्हाला डिलिट झालेली पोस्ट पहायला मिळेल -आता जी पोस्ट रिकव्हर करायची आहे ती निवडाय
-रिकव्हरी करताना तुम्हाला तुमच्या फोन क्रमांकावर एक ओटीपी येईल -आता ओटीपी द्या -असे केल्याने तुमची डिलिट झालेली पोस्ट रिकव्हर करता येईल लक्षात असू द्या की, डिलिट झालेली पोस्ट
फक्त 30 दिवसांपर्यंत Recently Deleted सेक्शन मध्ये दिसून येते. युजर्सला डिलिट पोस्ट ही 30 दिवसांच्या आतमध्येच रिकव्हर करता येणार आहे. त्यानंतर मात्र पोस्ट कायमची डिलिट होणार आहे. ती पुन्हा कधीच तुम्हाला रिकव्हर करता येणार नाही आहे.