Youtube वर व्हिडिओ ट्रेंड होण्यासाठी खास '4' टिप्स !
युट्युब (Photo Credits: Getty Imgaes)

सध्या युट्युबवर ऑनलाईन व्हिडिओज पाहण्याचा ट्रेंड आहे. गेल्या काही वर्षात भारतात युट्युबर्सची संख्या जबरदस्त वाढत आहे. त्याचबरोबर ते पाहणाऱ्यांची संख्याही वाढत आहे. याचे श्रेय टेलिकॉम कंपन्यांच्या स्वस्त टेडा प्लॅन्सला जातं.

अलिकडे अनेक तरुण मंडळी व्हिडिओज बनवून युट्युबवर अपलोड करताना दिसतात. अनेकजण युट्युबवर व्हिडिओज अपलोड करुन चांगली कमाई करतात. पण फक्त व्हिडिओज अपलोड करुन नाही तर तुमच्या व्हिडिओजला मिळालेल्या व्ह्युज मधूनही तुम्ही चांगली कमाई करु शकता. त्यासाठी तुमचा व्हिडिओ युट्युबवर ट्रेंड होणे गरजेचे आहे. त्यासाठी सोप्या 4 ट्रिक्स...

डिस्क्रिप्शन हटके असावं

व्हिडिओ ट्रेंड होण्यासाठी कमीत कमी 300 शब्दांचे डिस्क्रिप्शन असणे गरजेचे आहे. व्हिडिओचे डिस्क्रिप्शन जितके सुरेख लिहाल तितका व्हिडिओ ट्रेंड होण्याची शक्यता अधिक असते. त्याचबरोबर डिस्क्रिप्शनमध्ये तुमच्या एखाद्या लोकप्रिय व्हिडिओची लिंक देखील तुम्ही टाकू शकता. त्यामुळे त्या व्हिडिओजे व्ह्युज वाढण्याची शक्यताही अधिक असते.

योग्य Tags आणि Keywords

अधिकाधिक लोकांनी व्हिडिओ पाहिल्यानंतरच तो ट्रेंडमध्ये येतो आणि व्हिडिओ तेव्हाच बघितला जाईल जेव्हा ट्रेडिंग कीवर्ड आणि टॅग व्हिडिओमध्ये टाकले जातील. यासाठी व्हिडिओ युट्युबवर अपलोड करताना ट्रेडिंग किवर्ड्स आणि टॅग्स जरुर वापरा.

व्हिडिओचे थंबनेल आकर्षक असावं

व्हिडिओ व्हायरल होण्यासाठी त्याचे थंबनेल (व्हिडिओ सुरु होताना दिसणारा फोटो) आकर्षक असणे गरजेचे आहे. कारण तेच पाहुन आपण व्हिडिओवर क्लिक करतो. त्यामुळे व्हिडिओचे थंबनेल असे ठेवा की ज्यामुळे युजर्स व्हिडिओवर क्लिक करतील.

सोशल मीडियावर शेअर करा

व्हिडिओ व्हायरल होण्यासाठी सोशल मीडियावर शेअर करणे गरजेचे आहे. कारण जोपर्यंत व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर होत नाही तोपर्यंत तो व्हायरल होणार नाही किंवा ट्रेंडमध्ये येणार नाही.