
सध्याच्या काळात इंस्टाग्राम ही सर्वात लोकप्रिय सोशल नेटवर्किंग साईट आहे. सतत अपडेट होणारे याचे नवे फिचर्स तरुणाईला भूरळ पाडतात. सुरुवातीला इंस्टाग्राममध्ये फक्त फोटो शेअर करण्याचा पर्याय होता. त्यावर तुम्ही लाईक किंवा कमेंट करु शकत होतात. पण त्यानंतर इंस्टाग्रामने स्टोरीजचे नवे फिचर सुरु केले. या स्टोरीज २४ तासांच्या अवधीपर्यंत पेजवर राहतात. या फिचरमुळे इंस्टाग्राम खूप लोकप्रिय होऊ लागले.
आजकाल तरुणाई सोशल मीडियातील इतर साईट्सपेक्षा इंस्टाग्रामला अधिक पसंती देते. त्याचबरोबर इंस्टाग्रामवर लोकप्रिय होणेही तरुणाईला भावते. पण यासाठी गरजेचे आहे फॉलोअर्स वाढणे. ही गोष्ट वाटते तितकी कठीण नाही. या सोप्या टिप्सने तुम्ही इंस्टाचे फॉलोअर्स वाढवू शकता...
दमदार DP आणि BIO
DP दमदार असेल तर लोक आकर्षित होतात. तुमचे प्रोफाईल कसे दिसते, हे लोक सर्वप्रथम पाहतात. लोक जेव्हा फॉलो करण्यासाठी तुमच्या पेजवर येतात तेव्हा प्रोफाईलचा फर्स्ट लूक त्यांना चांगला वाटायला हवा. तो आवडल्यास ते हमसाख फॉलोवर क्लिक करतील. त्याचबरोबर तुम्ही बायोमध्ये काय लिहिले आहे, हे देखील महत्त्वाचे आहे. कारण त्यातूनच तुमची ओळख होते. इंस्टाग्रामवर मात्र फर्स्ट इम्प्रेशन इज लास्ट इम्प्रेशन ही गोष्ट लागू होते.
अॅक्टीव्ह युजर बना
इंस्टाग्रामवर तुमचा दबदबा निर्माण करण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम अॅक्टीव्ह युजर बनावे लागेल. तुमची अॅक्टीव्हीटी जसजशी लोकांसमोर येईल तसतसे तुमचे युजर्स वाढू लागतील. पण तुमची अॅक्टीव्हीटी लोकांना भावणे गरजेचे आहे.
# हॅशटॅगचा वापर करा
सध्या सोशल मीडियावर सगळीकडेच # (Hashtag)चा वापर होतो. तुम्ही देखील या # (Hashtag)चा तुमच्या अॅक्टीव्हीटीमध्ये समावेश करुन पोस्ट करा. काही नवनवीन क्रिएव्हीट गोष्टी करा. त्याचबरोबर दरदिवशी सोशल मीडियावर # सोबत काही ट्रेंड सुरु असतात. त्यावर लक्ष ठेवा. या ट्रेंडवर तुमचा अनुभव किंवा विचार शेअर केल्याने देखील फॉलोअर्स वाढण्यास मदत होईल.
लाईक आणि कमेंट
सोशल मीडियावर लाईक आणि कमेंट्स केल्याने तुमच्या अॅक्टीव्हीटीची माहिती मिळते. ट्रेंड आणि व्हायरल पोस्ट्सवर लाईक करा किंवा काही लक्षवेधी कमेंट करा. त्यामुळे लोक तुमच्याकडे आकर्षित होतील आणि तुमचे प्रोफाईल व्हिझिट करण्यात इंटरेस्टेट असतील.
ट्रेंड्स आणि व्हायरल
सोशल मीडियामध्ये ट्रेंड आणि व्हायरल यांचे प्रस्थ अधिक आहे. आजकाल ट्रेंडची सुरुवातही सोशल मीडियावरुन होते. त्यामुळे बदलत्या काळानुसार सोशल मीडियावरील ट्रेंडचा वापर करा. त्यामुळे त्या ट्रेंडसोबतच तुम्हीही लोकप्रिय व्हाल.