मृत्यूनंतर तुमचे Google Account आपोआप डिलिट होणार; अशी करा सेटिंग
Gmail | Representational Image | (Photo Credits: Twitter)

सध्याचे युग हे डिजिटल आहे. त्यामुळे आपली बरीच माहिती जीमेल अकाऊंटमुळे त्याच्या सर्व्हरवर स्टोर होत असते. पण आपल्या मृत्यूनंतर या जीमेल अकाऊंटचं नेमकं काय होतं किंवा काय होईल? तर सातत्याने युजर्सच्या मदतीसाठी विविध फिचर्स आणि सुविधा देणारं जीमेल मृत्यूनंतर आपल्या अकाऊंटचं नेमकं काय करणार? याची चिंता तुम्ही करु नका. कारण मृत्यूनंतर तुमचं जीमेल अकाऊंट आपोआप डिलिट करण्याची सुविधा जीमेलने उपलब्ध करुन दिली आहे. त्यासाठी तुम्हाला फक्त विशिष्ट सेटिंग करावी लागेल.

जाणून घेऊया त्यासाठी सोप्या स्टेप्स:

# सर्वप्रथम myaccount.google.com या लिंक वर जा.

# नंतर Data & personalization या पर्यायावर क्लिक करा.

# त्यानंतर स्क्रोल डाऊन करून Make a plan for your account या ऑप्शनवर क्लिक करा.

# त्या खाली असलेल्या Start ऑप्शनवर क्लिक करा.

त्यानंतर तुम्हाला जीमेल अकाऊंट डिलिट करण्यासाठी अजून एक पर्याय दिसेल. त्याद्वारे अकाऊंट किती काळ बंद राहिल्यानंतर कंपनीकडून ते डिलिट होईल, हे तुम्ही ठरवू शकता. Start ऑप्शनवर क्लिक केल्यावर तुम्हाला इनअॅक्टीव्ह मॅनेजरचं पेज दिसेल. त्यात तुम्हाला 3, 6, 12 आणि 18 महिने असे 4 पर्याय उपलब्ध असतील. यातील तुमच्या सोयीनुसार तुम्ही पर्याय निवडू शकता. (Gmail च्या नव्या Schedule Send फिचरद्वारे आता मेलही करा शेड्यूल; जाणून घ्या कसे वापराल हे फिचर?)

तुम्ही निवडलेल्या पर्यायानुसार तितका वेळ अकाऊंट बंद असल्यास कंपनीकडून ते डिलिट केलं जाईल. मात्र तुम्ही निवडलेल्या पर्यायाचा कालावधी संपत आल्यावर 1 महिना अगोदर SMS किंवा मेलद्वारे तुमच्याशी संपर्क करण्यात येतो व त्यानंतरच पुढील प्रक्रिया केली जाते.

त्याचबरोबर तुम्ही तुमच्या जवळच्या 10 व्यक्तींची नावे त्यात समाविष्ट करु शकता. ज्यामुळे तुमचं जीमेल अकाउंट डिलिट केल्याचं नोटिफिकेशन त्या 10 व्यक्तींना मिळेल. तसंच तुम्ही ऑटो रिप्लाय हा पर्याय देखील निवडू शकता. यामुळे तुम्ही हे अकाऊंट वापरत नसल्याचा मेसेज आपोआप तुम्हाला मेल करणाऱ्या व्यक्तीला जाईल.