Honor Watch GS Pro, Honor Watch (Photo Credits-Twitter)

Honor यांनी त्यांचे स्मार्टवॉच सेगमेंट मध्ये दोन नवे डिवाईस Honor Watch GS Pro आणि Honor Watch ES लॉन्च केले आहे. या दोन्ही डिवाइसमध्ये युजर्सच्या हार्ट रेट मॉनिटरिंगसह काही खास फिचर्स सुद्धा दिले जाणार आहे. सध्या कंपनीने हे स्मार्टवॉच ग्लोबल मार्केट मध्ये लॉन्च केले आहे. त्यामुळे लवकरच कंपनी भारतात सुद्धा हे स्मार्टवॉच लॉन्च करण्याची अपेक्षा आहे. तर जाणून घ्या हॉनर कंपनीच्या या दोन नव्या स्मार्टवॉच्या किंमतीसह फिचर्स बद्दल अधिक माहिती.

Watch GS Pro हे स्मार्टवॉच EUR 249.99 म्हणजेच जवळजवळ 21,600 रुपयांत लॉन्च केले आहे. तर Honor Watch ES ची किंमत EUR 99.99 म्हणजेच 8700 रुपये आहे. युरोपियन मार्केटमध्ये हे दोन्ही स्मार्टवॉच येत्या 7 सप्टेंबर पासून सेलसाठी उपलब्ध करुन दिले जाणार आहेत. तर भारतात ऑक्टोंबर महिन्यात लॉन्च केले जाऊ शकतात.(Oppo Enco W51 वायरलेस ईयरफोन्स भारतात लाँच, संगीताचा जबरदस्त अनुभव देणा-या या गॅजेटची वैशिष्ट्ये ऐकून तुम्हीही व्हाल थक्क)

Honor Watch GS Pro मध्ये 1.39 इंचाचा एमोलेड डिस्प्ले दिला आहे. याची स्क्रिन रेज्योल्यूशन 454X454 पिक्सल आहे. हे स्मार्टवॉच Kirin A1 चिपसेटवर काम करणार आहे. त्याचसोबत यामध्ये युजर्सला लोकेशन ट्रॅक करण्यासाठी ड्युअल सेटेलाइट पॉजिशनिंग सिस्टिमसह जीपीएस सपोर्ट मिळणार आहे. या स्मार्टवॉचमध्ये मल्टी स्किंग मोड्स प्रीलोडेड असून जे युजर्सला आउटडोर बद्दल माहिती म्हणजेच सूर्योदय आणि सुर्यास्तासारखी माहिती देणार आहे. या व्यतिरिक्त 100 वर्कआउट्स मोड्स सुद्धा उपलब्ध आहेत. ज्यामध्ये 15 प्रोफेशनल आणि 85 कस्टमाइज मोड्स आहेत. स्मार्टवॉचमध्ये 24/7 हार्ट रेट मॉनिटरिंग, स्लीप ट्रॅकिंग, Sp02 मॉनिटर, बिल्ट इन स्पीकर आणि मायक्रोफोन सारखे फिचर्स दिले जाणार आहेत. हे डिवाइस अॅन्ड्रॉइड आणि आयओएसला सुद्धा सपोर्ट करण्यास सक्षम आहे.

Honor Watch ES मध्ये 456X280 पिक्सलच्या स्क्रिन रेजोल्यूशनसह 1.64 इंचाचा एमोलेड डिस्प्ले दिला आहे. यामध्ये Always-On स्क्रिनसह 2.5D ग्लास कव्हर ही मिळणार आहे. फिचर्स बद्दल बोलायचे झाल्यास यामध्ये युजर्सला 95 वर्कआउट्स मोड्स, 12 अॅनिमेटेड वर्कआउट क्लासेस, 44 अॅनिमेटेड एक्सरसाइज मूव्स दिले आहे. यामध्ये सुद्धा 24/7 हार्ट रेट मॉनिटरिंग आणि स्लिप मॉनिटरिंग सारखे फिचर्स उपलब्ध आहेत.