Flipkart | Representational Image | (Photo Credit: Official)

देशातली सर्वात मोठी ऑनलाइन शॉपिंग कंपनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या फ्लिपकार्टवर (Flipkart) ऑनर डेज सेल (Honor Days Sale) सुरू आहे. ही ऑफर 23 जून ते 27 जूनपर्यंत आहे. यामुळे ग्राहकांना घर बसल्या आणि किंमतीत वस्तू विकत घेता येणार आहेत. फ्लिपकार्टवरून एचडीएफसी बँक कार्ड आणि ईएमआय ट्रान्झॅक्शनवर 10 टक्के तात्काळ डिस्काउंट देत आहे. या सेलमध्ये हेडफोन्सवर 70 टक्के सूट दिली जात आहे. तसेच गेमिंग, लॅपटॉप, स्मार्टवॉच, स्मार्टफोन्स आणि अन्य डिव्हाईसेजवर सुद्धा सूट मिळत आहे.

ऑनर डेज सेलमध्ये 10 हजार रुपयां पर्यंत डिस्काउंट या वॉचवर दिला जात आहे. या वॉचच्या सिल्वर व्हेरियंट मॅजिकला 7 हजार 999 रुपये तर, लावा ब्लॅक व्हेरियंटला 6 हजार 999 रुपयांत खरेदी करता येऊ शकते. तसेच सेलमध्ये या वॉचचा चारकोल ब्लॅक व्हेरियंट 46 एमएम मॅजिक वॉच-2 10 हजार 999 रुपयात मिळत आहे. फ्लॅक्स ब्राऊन व्हेरियंट 12 हजार 999 रुपयात खरेदी करता येऊ शकतो. 42 एमएम ऑनर मॅजिक वॉच-2 केवळ 13 हजार 999 रुपयांत खरेदी करता येऊ शकतो. याशिवाय ऑनर बँड 5 स्वस्तात खरेदी करण्याची संधी उपलब्ध झाली आहे. या बँडवर 900 रुपयांचा सूट मिळत आहे. हे देखील वाचा- OnePlus 8 Pro 5G India Sale Today: आज दुपारी 12 पासून Amazon.in आणि OnePlus.in वर सेलला सुरुवात; जाणून घ्या किंमत आणि ऑफर्स

तसेच या सेलमध्ये रियलमी 6 आणि मोटो जी 8 या स्मार्टफोनवरही मोठी सूट देण्यात आली आहे. आयफोन 7 प्लस 37 हजार 900 रुपयाऐवजी 34 हजार 999 रुपयांमध्ये ग्राहकांना विकत घेता येणार आहे. स्मार्टफोनवर नो कॉस्ट ईएमाय, कार्डलेस क्रेडिट आणि एक्सचेंज ऑफर सुद्धा देण्यात येत आहे. टीव्ही आणि इतर इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनावर सुद्धा या फ्लिपकार्ट सेलमध्ये एक्सचेंज ऑफर मध्ये खरेदी करण्याची संधी आहे.