Google Holi Trick (PC - Google)

Holi 2020 Google Trick: प्रत्येक सणाला गुगल नवीन-नवीन ट्रिक्स घेऊन येत असतं. होळी सणानिमित्तही गुगलने आपल्या युझर्संना खास रंगीत ट्रिक्स सांगितल्या आहेत. या ट्रिक्स वापरून युझर्स आपल्या स्मार्टफोन (Smartphone) तसेच लॅपटॉपमध्ये (Laptop) सुरक्षित होळी खेळू शकतो. तुम्हालाही वर्चुअल होळी खेळायला नक्कीचं आवडेल.

गुगलने आपल्या युझर्सना वर्चुअल पद्धतीने आणि सुरक्षिततरित्या होळी खेळण्याच्या ट्रिक्स (Google Holi Trick) सांगितल्या आहेत. तुम्ही या ट्रिक्स वापरून तुमच्या स्मार्टफोनमध्ये अगदी सोप्या पद्धतीने होळीचा आनंद लूट शकता. यासाठी तुम्हाला गुगल सर्च इंजिनवर जाऊन केवळ Holi असं टाईप करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला तेथे रंगाने भरलेले वाट्या दिसतील. त्यावर क्लिक केल्यास युझर्स स्क्रिनवर कुठेही रंगाची उधळण करू शकतो. युझर्सच्या प्रत्येक एका टॅपला स्क्रिनवर वेगवेगळ्या रंगाची उधळण होते. या पद्धतीने युझर्स संपूर्ण स्क्रिनवर रंगाची उधळण करू शकतो. (हेहा वाचा - Holi 2020 Skin Care Tips: धुळवड, रंगपंचमी दिवशी होळीच्या रंगांत माखण्यापूर्वी त्वचेचं नुकसान टाळण्यासाठी 'या' गोष्टी नक्की कराच!)

Google Holi Trick (PC - Google)

गुगलची ही ट्रिक्स मोबाईल तसेच लॅपटॉपवर उपलब्ध आहे. अॅन्ड्राईड आणि आईओएस या दोन्ही युझर्ससाठी गुगलची ही ट्रिक्स लागू आहे. परंतु, यासाठी तुम्हाला गुगलच्या सर्च पेजवर जाव लागणार आहे. गुगलने यासंदर्भात आपल्या ट्विटर अकाऊंटवरून माहिती दिली आहे. या ट्विटमध्ये गुगने स्मार्टफोनवर होळी खेळण्याच्या सर्व ट्रिक्स सांगितल्या आहेत.

विशेष म्हणजे तुम्हाला तुमचं वेब पेज होळी खेळल्यानंतर साफही करता येणार आहे. यासाठी तुम्हाला स्क्रिनवरील वॉटर ड्रॉप आईकॉनवर टॅप करावं लागेल. असं केल्यास तुमची स्क्रिन पुन्हा पहिल्यासाखी होईल. गुगलच्या या आभासी होळीचा आनंद नक्की घ्या आणि आपल्या मित्र-मैत्रिणींनाही गुगलच्या या ट्रिक्सविषयी नक्की सांगा.