Google+ पाठोपाठ आता Gmail चं Inbox अॅप देखील बंद होणार आहे. मागील वर्षी 2 एप्रिल दिवशी गूगल प्लस ही सेवा बंद करण्यात आली होती आणि आता मोबाईल जीमेल अॅप बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 2014 साली हे अॅप युजर्ससाठी खुलं करण्यात आलं होतं. सध्या जे युजर्स हे मोबाईल अॅप वापरत आहेत त्यांना काऊंट डाऊन देण्यात येत आहे.
मागील वर्षी सप्टेंबर महिन्यात इनबॉक्स बंद होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. अखेर त्याची अधिकृत माहिती गूगल कडून देण्यात आली आहे. प्रोडक्ट मैनेजर मैथ्यू इजाट्ट कडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, आम्ही सध्या युजर्सना सर्वात चांगल्या ईमेल सुविधा देण्याकडे लक्ष देत आहोत. मार्चअखेरीपर्यंत इनबॉक्स बंद करून नवी गोष्टींवर लक्ष दिले जाणार आहे.
जीमेलची इन्बॉक्स ही सुविधा बंद झाल्याने अनेकांना त्रास होणार आहे याची आम्हाला कल्पना आहे. मात्र हा बदल अधिक सुकर करण्याकडे आमचं लक्ष असेल त्यासाठी प्लॅन बनवण्यात आला असून इनबॉक्स मधून नव्या जीमेलमध्ये जाणं सुकर होणार आहे.