गुगलकडून (Google) त्यांची फ्री सर्विस आता बंद केली जाणार आहे. खरंतर गुगलने त्यांची Google Photo फ्री क्लाउड स्टोरेजची सुविधा येत्या 1 जून पासून बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. म्हणजेच आता युजर्सला क्लाउड स्टोरेजसाठी पैसे मोजावे लागणार आहेत. जर तुम्ही Google ड्राइव्ह किंवा अन्य ठिकाणी फोटोसह डेटा स्टोअर करत असल्यास तुम्हाला त्यासाठी पैसे द्यावे लागणार आहे. कंपनीने यापूर्वीच या बद्दल घोषणा केली होती.(Work From Home Postpaid Plan: घरातून काम करण्यासाठी सर्वोत्तम 4G पोस्टपेड प्लान; जाणून घ्या जिओ, एअरटेल आणि Vi चा 'वर्क फ्रॉम होम पोस्टपेड प्लान')
सध्या गुगलकडून ग्राहकांना अनलिमिडेट मोफत स्टोरेजची सुविधा दिली जात आहे. त्यामुळे युजर्सला आपले अन्य डॉक्युमेंटेस ऑनलाईन स्टोअर करता येतात. तसेच इंटरनेटच्या माध्यमातून ते कधीही एक्सेस करता येऊ शकतात. परंतु आता ग्राहकांना येत्या 1 जून पासून 15GB मोफत क्लाउड स्टोरेजची सुविधा दिली जाणार आहे. त्यामुळे त्यापेक्षा अधिक फोटो किंवा डॉक्युमेंट ऑनलाईन स्टोअर करु इच्छितो तर त्यांना पैसे मोजावे लागणार आहेत.(Instagram वर Clubhouse सारखे फिचर, लाईव्ह दरम्यान व्हिडिओ-ऑडिओ करता येणार बंद)
जर युजर्सला 15GB पेक्षा अधिक डेटाची गरज असल्यास त्यांना प्रति महिन्याच्या हिशोबाने 1.99 डॉलर (149 रुपये) मोजावे लागणार आहेत. कंपनीकडून त्याला Google One असे नाव दिले आहे. त्याचे वार्षिक सब्सक्रिप्शन सुद्धा घेता येणार आहे. तर जुने फोटो आधीसारखेच सुरक्षित पद्धतीने स्टोअर केले जातील. याच पद्धतीने Google Pixel 2,3,4,5 स्मार्टफोन युजर्सला ही फ्री फोटो आणि व्हिडिओ स्टोरेजची सुविधा मिळणार आहे.