Gmail | (File Photo)

Google Warns Gmail Users: गुगलने Gmail वापरकर्त्यांना इशारा दिला आहे. वापरकर्त्यांनी कंपनीचे नवीन नियम स्वीकारणे आवश्यक आहे. जर वापकर्त्यांनी नवीन नियमांचे पालन केले नाही, तर Gmail चे बरीच फिचर्स त्यांच्यासाठी बंद केली जाऊ शकतात, असा इशाराही जीमेलच्या वापरकर्त्यांना देण्यात आला आहे. नवीन नियमांचे पालन न केल्यास वापरकर्ते हे विशेष फिचर्स वापरू शकणार नाहीत, express.co.uk ने दिलेल्या अहवालात असे सांगितले आहे.

Gmail ची ही खास वैशिष्ट्ये ब्लॉक केली जाऊ शकतात -

अहवालानुसार, गुगलकडून हा इशारा 25 जानेवारीच्या अंतिम मुदतीआधी आला होता. अंतिम मुदत संपण्यापूर्वी नवीन नियम स्वीकारण्यात अयशस्वी झाल्यास स्मार्ट कंपोझिट्स, असिस्टेंट रिमाइंडर्स आणि ऑटोमॅटिक ई-मेल फिल्टरिंग सारखी काही वैशिष्ट्ये ब्लॉक होतील. गुगलने जीमेल स्मॉल-प्रिंट अपडेट केले आहे. वापरकर्त्यांना त्यांच्या वैयक्तिक डेटावर अधिक नियंत्रण ठेवणे आणि कंट्रोलसह संबंधित गरजांना सपोर्ट करणे हा त्याचा हेतू आहे. (वाचा - WhatsApp वर चॅटिंगची मजा द्विगुणित करण्यासाठी लवकरच येत आहे 'Sticker Shortcut' फिचर, जाणून घ्या काय असेल यात विशेष)

गूगलच्या या अपडेटमुळे वापरकर्त्यांना अ‍ॅपमधील काही वैशिष्ट्ये वापरण्याच्या मोबदल्यात कंपनीबरोबर काही डेटा शेअर करायचा आहे की नाही हा पर्याय देण्यात आला आहे. जर आपल्याला 25 जानेवारी 2021 नंतर ही वैशिष्ट्ये वापरणे सुरू ठेवायचे असेल, तर आपल्याला या विशेष वैशिष्ट्यांना चालू ठेवण्यासाठी Google सेटिंग्जमध्ये निवड करावी लागेल. यापूर्वी, गुगलने वापरकर्त्यांना चेतावणी दिली होती की, त्यांनी नवीन नियमांचे पालन न केल्यास त्यांचे जीमेल, गुगल फोटो आणि गुगल ड्राईव्ह सामग्री हटविली जाऊ शकते.