Google Chrome Browser (Photo Credits-Twitter)

गुगल ही जगातील सर्वात मोठे सर्च इंजिन असून करोडोच्या संख्येने याचा वापर करतात. मात्र आता युजर्ससाठी आता एक वाईट बातमी आहे. कारण गुगल त्यांची एक खास सर्विस बंद करणार आहे. ही सर्विस जून 2022 पासून सर्व प्लॅटफॉर्मवरुन हटवण्यात येणार आहे. 9टू5 गुगल यांच्या मते, गुगल क्रोम वेब स्टोर वर लवकरच नवे कोणते सबमिशन सुद्धा देणार नाही आहेत. कारण गुगल क्रोम अॅप बंद करण्यात येणार आहेत. जाहीर करण्यात आलेल्या टाईमलाईनुसार, गुगल हे पाऊल मार्च 2020 मध्ये उचलणार आहे.

सबमिशन बंद झाल्यानंतर डेवलपर्सना या प्लॅटफॉर्मलर कोणतेही नवे अॅप्स आणता येणार नाही आहेत. पण जुने अॅप अद्याप सुरु असून त्यांची खासियत म्हणजे डेवलपर्स हे अॅप जून 2020 पर्यंत अपडेट करु शकतात. गुगल क्रोम हे वेबच्या माध्यमातून इन्स्टॉल करता येते. हे एका अॅप प्रमाणे काम करते. गुगल यांचे असे म्हणणे आहे की, जून 2020 पासून व्हिंडोज, मॅक आणि Linux सारख्या प्लॅटफॉर्मवरुन बंद करण्यात येणार आहे.(अंतराळात नासा बनवत आहे Space Home; पर्यटक अवकाशातून पाहू शकतील पृथ्वीचा 360 डिग्री व्ह्यू)

तसेच जर तुम्ही सुद्धा क्रोम वापरत असाल तर ही तुमच्यासाठी महत्वाची बातमी आहे. कारण गुगलने त्यांच्या क्रोम ब्राउजर युजर्सला ते अपडेट करावे असा सल्ला दिला आहे. त्यासाठी एक नवे फिक्स रोलआउट केले आहे. त्यामुळे हॅक होण्यापासून बचाव करणार आहे. ब्राउजर अपडेट न केल्यास हॅकर्सकडून तुमचे डिवाईस हॅक करण्याची शक्यता फार असते.