गुगलने (Google) कथित रुपात काही निवडक नॉन-पिक्सल युजर्ससाठी आपले सर्वाधिक खास फिचर रोलआउट करण्यास सुरु केले आहे. त्याचे नाव लॉक फोल्डर (Lock Folder) असे आहे. या फिचरच्या माध्यमातून गुगल फोटो अॅपमध्ये आपले खासगी फोटो आणि व्हिडिओ लॉक करता येणार आहेत. कारण यंदाच्या वर्षात मे मध्ये कंपनीने सर्वाधिक लॉक फोल्डर फिचरला Pixel स्मार्टफोनसाठी रोलाउट केले होते.(Facebook सारखेच Google लवकरच लाॅन्च करणार स्मार्टवॅाच, जाणून घ्या अधिक)
गुगल फोटोजमध्ये तुम्ही लॉक फोल्डरच्या मदतीने खासगी फोटो किंवा व्हिडिओ पासवर्ड लावून लॉक करु शकता. या फिचरची खासियत अशी की, ज्या अॅपला तुमचे फोटो किंवा व्हिडिओचे एक्सेस मिळते ते अॅप सुद्धा लॉक करण्यात आलेल्या फोटोपर्यंत पोहचू शकत नाहीत. ऐवढेच नव्हे तर फिचर लॉक फोटो किंवा व्हिडिओला डिवाइसच्या क्लाउडवर अपलोड होण्यापासून सुद्धा थांबवते.(WhatsApp ने एका महिन्यात 20 लाखांहून अधिक भारतीय युजर्सचे केले बंद अकाउंट्स, जाणून घ्या कारण)
गुगलने अद्याप हे लॉक फोल्डर फिचर अधिकृत लॉन्च करण्यात आलेले नाही. परंतु हे फिचर काही डिवाइसमध्ये स्पॉट करण्यात आले आहे. त्यामुळे कळते की, फोटो किंवा व्हिडिओ कसे लॉक केले जाऊ शकतात.