Google New Feature: जर तुम्हाला तुमचे खासगी फोटो आणि व्हिडिओ दुसऱ्यांपासून लपवायचे असतील तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण गुगल आपले प्रोडक्ट Google Photos मध्ये एक खास फिचर घेऊन येणार आहे. कंपनीने घोषणा करत असे म्हटले की, यजुर्ससाठी लॉक फोल्डर फिचर रोलआउट केले जाणार आहे. याच्या मदतीने अॅन्ड्रॉइड युजर्सला आपले फोटो आणि व्हिडिओ लॉक करता येणार आहेत.
युजर्स जे फोटो आणि व्हिडिओ हाइड करतील ते मुख्य ग्रिड आणि सर्च मध्ये दाखवले जाणार नाहीत. अद्याप कंपनीने या फिचरच्या लॉन्चिंग बद्दल कोणताही खुलासा केलेला नाही. मात्र मीडिया रिपोर्ट्सनुसार, गुगल फोटोचे भन्नाट फिचर पुढील वर्षात जून मध्ये रोलआउट केले जाउ शकते. हे फिचर सर्वात प्रथम गुगलचा अपकमिंग स्मार्टफोन पिक्सल 6 सोबत दिले जाऊ शकते. त्यानंतरच दुसऱ्या कंपन्यांना या फिचर्सचा सपोर्ट दिला जाऊ शकतो.(WhatsApp नवे फिचर्स आणण्याची शक्यता, युजर्सला ग्रुप कॉल शर्टकट सोबत इतरही अनेक पर्याय मिळण्याची शक्यता)
-तर गुगल फोल्डर वापरण्यासाठी प्रथम Google Photos च्या Library मध्ये जावे
-लायब्रेरी मध्ये Utilities चा ऑप्शन दिसेल त्यावर क्लिक करा
-क्लिक केल्याननंतर तुम्हाला Locked Folder चा ऑप्शन दिसेल
-असे केल्यानंतर फोल्डरमध्ये खासगी फोटो-व्हिडिओ लॉक होतील
-तुम्ही त्यासाठी पासकोड सुद्धा लावू शकता. त्यामुळे ते कोणीही पाहू शकणार नाही
गुगल फोटोचे हे फिचर युजर्ससाठी अत्यंत फायदेशीर ठरणार आहे. फोटो आणि व्हिडिओला लॉक लावल्यानंतर ते कोणाही पाहू शकणार नाही आहे. त्याचसोबत लॉक फोटोचा स्क्रिन शॉट घेणे सुद्धा शक्य होणार नाही आहे.