दिग्गज टेक कंपनी Google ने वर्क फ्रॉम होम करणाऱ्या युजर्ससाठी त्यांचे व्हिडिओ कॉलिंग प्लॅटफॉर्म Google Meet ची सुविधा सुरु केली आहे. या सुविधेत आता युजर्ससाठी एक नवे फिचर रोलआउट केले आहे. या फिचरला Noise Cancellation असे नाव दिले आहे. गुगल मिटच्या या नव्या फिचरमुळे दोन्ही अॅन्ड्रॉइड आणि आयओएस युजर्स व्हिडिओ कॉलच्या वेळी Background मध्ये निर्माण होणाऱ्या आवाजावर बंदी घालता येणार आहे. तर कंपनीने जुन महिन्यात हे फिचर डेस्कटॉप वर्जनसाठी उपलब्ध करुन दिले होते.(Zohra Segal Google Doodle: जोहरा सेहगल यांच्या स्मरणार्थ गुगलने आपल्या खास शैलीत डूडल बनवून या दिवंगत अभिनेत्रीला दिली अनोखी मानवंदना!)
गुगलच्या अधिकृत ब्लॉग नुसार, G Suite टीमचे असे म्हणणे आहे की, गुगल मीटचे नवे नॉइज कॅन्सिलेशन फिचर आर्टिफिशल इटेलिजेंस तंत्रज्ञानावर आधारित आहे. या फिचरच्या मदतीने व्हिडिओ कॉलिंगच्या वेळी Background मध्ये निर्माण होणाऱ्या आवाजावर नियंत्रण मिळवता येणार आहे. सध्या हे फिचर G Suite बेसिक, G सूट फॉर नॉन-प्रॉफिट कस्टमर्स आणि G सूट फॉर एज्युकेशनसाठी उपलब्ध नाही आहे. ही सुविधा डिफॉल्ट रुपात आहे. ती अॅक्टिव्ह करण्यासाठी तुम्हाला प्रथम सेटिंग्स मध्ये देण्यात आलेल्या More वर टॅप करावे लागणार आहे. त्यानंतर Noise Cancellation फिचरमुळे सुरु होणार आहे.(Google Maps Gets COVID Layer: 220 देशांच्या गुगल मॅपमध्ये दिसणार कोविड लेअर; सुरक्षित प्रवासासाठी कोविड-19 डेटा मॅपवर उपलब्ध)
गुगलने ऑगस्ट महिन्यात मुलांच्या अभ्यासाठी The Anywhere School नावाची सुविधा सुरु केली होती. यामध्ये युजर्सला एकच नाही तर 50 फिचर्सची सुविधा मिळणार आहे. युजर्सला याचा लाभ Meet, Classroom, G Suite आणि Google च्या अन्य प्लॅटफॉर्मवर घेता येणार आहे. ऑक्टोंबर महिन्यात Google मध्ये काही अतिरिक्त सुरक्षितता देण्यासाठी Meet मध्ये कस्टम लॉन्च करणार आहे. त्याचसोबत गुगलच्या The Anywhere School सर्विसच्या मदतीने अभ्यासाचा बोझा कमी होणार आहे. त्याचसोबत कंपनी लवकरच ब्रेकआउट रुम आणि अटेंड्स ट्रॅकिंग सुद्धा जाहीर करणार आहे.