Google (Photo: Shutterstock)

सोशल मीडियात टिकटॉक या अॅपचे युजर्स करोडोंच्या संख्येने आहेत. मात्र टिकटॉकला आता टक्कर देण्यासाठी गुगलने Tangi नावाचे अॅप आणले आहे. हे एक प्रयोगिकतत्वावरील अॅप असून Google Area 120 अंतर्गत बनवण्यात आले आहे. सध्या हे अॅप मोबाईल आणि वेब या दोन्ही प्लॅटफॉर्मवर उपलब्ध करुन देण्यात आले आहे. टिकटॉकची पॉप्युलिरिटी पाहता फेसबुक नंतर आता गुगलने सुद्धा या पद्धतीने अॅप लॉन्च केले असले तरीही ते फक्त मनोरंजनासाठी नसणार आहे. मात्र या अॅपच्या माध्यमातून व्हिडिओ शूट करणे अधिक मजेदार होणार आहे.

Tangi अंतर्गत 60 सेकंदाचा व्हिडिओ रेकॉर्ड केला जाऊ शकतो. मात्र टिकटॉक पेक्षा हा अॅप अधिक वेगळा असून विविध प्रकारचे व्हिडिओ यावर युजर्सला बनवता येणार आहेत. यामध्ये कुकिंग, क्राफ्ट, मेकअप, कपड्यांसबंधित व्हिडिओ तयार करता येणार आहेत. Tangi या अॅपचा मुख्य अर्थ म्हणजे Teach and Give असा आहे. या अॅपवर युजर्सला खासकरुन विविध गोष्टींबाबतचे टुटोरियल्स पाहता येणार आहेत. पण गुगल प्ले स्टोअरवर हे अॅप अद्याप उपलब्ध करण्यात आलेले नाही.(Instagram युजर्ससाठी TikTok सारखे फिचर्स रोलआऊट)

 तसेच टिकटॉक अॅपला टक्कर देण्यासाठी आणखी एक अॅप लॉन्च करण्यात आले आहे. Byte असे अॅपचे नाव असून त्यावर सुद्धा 6 सेकेंदाचा व्हिडिओ शूट करता येणार आहे. या अॅपमधून व्हिडिओ शूट करुन ते अपलोड केल्याचा ऑप्शन देण्यात आला आहे. त्यानुसार व्हिडिओ शूट करुन अपलोड करणाऱ्या युजर्सला या अॅपच्या माध्यमातून पैसे कमवण्याची संधी उपलब्ध करुन देण्यात आली आहे.