गुगल (Photo Credit: Shutterstock)

गुगलने (Google) नवे Neighbourly अॅप (App) लॉन्च केले आहे. या अॅपच्या मदतीने युजर्स आपल्या जवळपासच्या परिसरातील माहिती मिळवू शकतात. हे अॅप सर्वप्रथम मुंबईत लॉन्च करण्यात आले आहे. त्यानंतर ते जयपूर, अहमदाबाद, कोयंबतूर आणि म्हैसूर या भागात सादर करण्यात येईल. मुंबईनंतर दिल्ली आणि बंगळुरुमध्येही हे अॅप लॉन्च करण्यात आले. गुगल लवकरच हे अॅप राष्ट्रीय स्तरावर सादर करेल. जाणून घेऊया काय आहेत या अॅपची खासियत आणि वापरण्याची पद्धत...

# सर्वप्रथम गुगल प्ले स्टोरवर जाऊन Neighbourly अॅप डाऊनलोड करुन इंस्टॉल करा.

# अॅप इंस्टॉल केल्यानंतर एक स्क्रीन ओपन होईल त्यावर Done वर टॅप करा. त्यानंतर मेन स्क्रीनवर जावून अॅप ओपन करा.

# अॅप ओपन झाल्यानंतर त्यात तुम्हाला Find Local Questions चा ऑप्शन मिळेल. त्यावर टॅप करा. त्यानंतर तुमच्याकडून काही परवानगी मागितली जाईल. ते Allow करा. त्यानंतर तुमचा आजूबाजूचा भाग डिटेक्ट होईल. तेथे तुम्हाला Continue as (Your name) चा पर्याय मिळेल. त्यावर क्लिक करा.

# त्यावर तुमच्या आजूबाजूच्या परिसरातील काही युजर्सने प्रश्न विचारले असतील. तुम्ही त्या प्रश्नांची उत्तरे देऊ शकता आणि त्याचबरोबर काही प्रश्न देखील विचारु शकता.

# यावर एका प्रश्नाला दिलेल्या उत्तरांची यादीही तुम्हीही पाहु शकता.

# या अॅपवर तुम्ही एकाहून अधिक Neighbourhood अॅड करु शकता.

हे अॅप येत्या काही दिवसांत चेन्नई, हैद्राबाद, पुणे आणि कोलकता या भागातही सुरु केले जाईल. आतापर्यंत हे अॅप भारतातील सात शहरांमध्ये उपलब्ध आहे.