Google (Photo Credits: IANS)

अल्फाबेट इंकचे मालकी हक्क असलेल्या गुगल कंपनीन सायबर हल्ल्यांपासून बचाव करण्यासाठी विविध उपयायोजना केल्या आहेत. गुगलने असे म्हटले आहे की, क्लाउड डिव्हिजनने इज्राइली सायबर सुरक्षा स्टार्टअप सिम्प्लिफाई (Simplify) ला खरेदी केले आहे. तर सायबर हल्ले आणि डेटा चोरीच्या वाढत्या घटनांमुळे गुगलने गेल्या वर्षात ऑगस्ट महिन्यात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बिडेन यांना आश्वासन दिले होते की, कंपनी पुढील पाच वर्षात सायबर सुरक्षिततेच्या क्षेत्रात 10 बिलियन डॉलरची गुंतवणूक करेल.(Xiaomi ला टक्कर देण्यासाठी iQoo लाॅन्च करणार ‘हा’ धमाकेदार स्मार्टफोन, जाणून घ्या फिचर्सबद्दल अधिक) 

दोन्ही कंपन्यांपैकी कोणीही कराराच्या आर्थिक विवरणाबद्दल खुलासा केलेला नाही. परंतु या प्रकरणासंबंधित एका सुत्राने असे म्हटले की, गुगलने सिम्प्लिफाई कंपनीला 500 मिलियन डॉलरचे पेमेंट केले आहे. सह-संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अमोस स्टर्न यांच्या नेतृत्वात सिम्प्लिफाई सुरक्षा व्यवस्था, ऑटोमेशन आणि फीडबॅक सुविधा देते. त्यांनी G20 वेंचर्स आणि 83 नॉर्थसह गुंतवणूकदारांसोबत 58 मिलियन डॉलर जमवले होते.(Vivo V23 Pro 5 जानेवारीला होणार भारतात लाॅन्च, स्मार्टफोन 12GB रॅमसह मिळणार) 

दरम्यान, 2020 मध्ये कोरोनाचे संकट ओढावल्यानंतर क्लाउड व्यवसायातून गुगलचे उत्पादन जवळजवळ दुप्पट होत 5 बिलियन डॉलर झाले आहे. कारण कंपन्या घरातून काम करण्यासाठी कर्मचाऱ्यांना सांगत आहेत. त्यामुळे मोठ्या संख्येने क्लाउडचा वापर केला जात आहे. अशातच धोक्यापासून बचाव करण्यासाठी सुरक्षिततेची अधिक गरज आहे, त्याचसोबत कॉर्पोरेट्स सुद्धा सायबर सुरक्षिततेवर अधिक जोर देत आहे.