तुमच्याही स्मार्टफोनमध्ये आहेत Beauty Camera आणि Pornografi अॅप? त्वरीत करा डिलीट, चोरी होऊ शकतो तुमचा खासगी डेटा
Google deletes 29 malicious app | (Photo credit: archived, edited, representative image)

तुमच्या स्मार्टफोनमध्ये (Smartphone ) असलेली अॅप तुम्ही पुन्हा एकदा तपासायला हवीत. जवळपास 29 ब्यटी कॅमेरा अॅप्स (Beauty Camera App) ही युजर्सचा खासगी डेटा चोरी करत असल्याचे पुढे आले आहे. यात काही पोर्नोग्राफी कंटेंट दर्शवणाऱ्या (Pornografi Content Indicator) अॅप्सचाही समावेश आहे. गुगलने आपल्या प्ले स्टोरवरुन जवळपास 29 Beauty Camer अॅप हटवली आहेत. ही अॅप अॅडल्ट कंटेंट पुरवत होती. तसेच, भारतीय युजर्सनाही ही अॅप अशा प्रकारचा कंटेंट शेअर करत होती. महत्त्वाचे म्हणजे ही अॅप युजर्सचा खासगी डेटा जमा करुन तो डेटा ती डाटा फिशिंग वेबासाट्सना देत होती. ज्यामुळे युजर्सचा डेटाही चोरी होत असे. अमेरिकास्थित सायबर सिक्योरिटी फर्म ट्रेंड मायक्रोच्या एका अहवालानुसार, यातील काही अॅप अँड्रॉईड अॅप लक्षवधीवेळा डाऊनलोड करण्यात आली आहेत. उल्लेखनीय असे की, यातील सर्वाधिक युजर्स हे भारतीय आहेत.

ट्रेंड मायक्रो ने सांगितले की, गूगलने ही अॅप प्ले स्टोरवरुन रिमूव्ह केली आहेत. सोबतच असेही म्हटले आहे की, जर एखाद्या यूजरने अशी अॅप डाऊनलोड केली असतील तर, त्यांना या अॅपमध्ये काही गडबड आहे असे वाटत नाही किंवा जाणवत नाही तोपर्यंत ते ही अॅप डिलिट करत नाहीत. जेव्हा युजर आपला फोन अनलॉक करतो तेव्हा यातील काही अॅप युजरला त्याच्या मोबाईल स्क्रिनवर फूर किंवा हाफ जाहीरात दर्शवतात. यात मालवेयर जाहिराती आणि फ्रॉड आणि अॅडल्ट / पोर्नोग्राफीक कंटेट अधीक असतो. हे युजरच्या ब्राऊजरवर पॉप अप येतात. (हेही वाचा, स्मार्टफोनच्या Low Memory मुळे चिंतेत आहात, तर 'या' ट्रिक्स येतील उपयोगी)

अहवालात असेही म्हटले आहे की, अभ्यासकांना आढळून आले आहे की, या पॉप अॅप्स वर क्लिक केल्यावर एक पेड ऑनलाईन अॅडल्ट प्लेयर स्वत:हूनच उघडला जातो. यात कोणतेही अॅप हे दाखवत नाही की, या जाहीरातींमागे ते स्वत: आहेत. त्यामुळे युजर्स वैतागून जातो की या जाहिराती कोठून येत आहेत. यातील काही अॅप्स युजर्सला फिशिंग बेबसाईट्सवर रीडायरेक्ट करतात. इथे युजर्सला त्याची खासगी माहिती जसे की, अॅड्रेस, फोन क्रमांक वैगेरे मागितले जातात.