Oppo A33 वर मिळतेय जबरदस्त सूट, कमी किंमतीत स्मार्टफोन खरेदी करण्याची आज आहे शेवटची संधी
Oppo A33 smartphone (Photo Credits: Oppo)

स्मार्टफोन निर्माता कंपनी ओप्पोने (Oppo) आपला नवा स्मार्टफोन Oppo A33 मागील महिन्यात (ऑक्टोबर) महिन्यात लाँच केला. जबरदस्त कॅमेरा फिचर (Camera Feature), बॅटरी लाईफ (Battery Life) आणि अन्य खास वैशिष्ट्ये असलेल्या या स्मार्टफोनमध्ये विशेष सूट ठेवण्यात आली आहे. याच स्मार्टफोनवर ऑनलाईन शॉपिंग साइट फ्लिपकार्टवर (Flipkart) विशेष सूट देण्यात आली आहे. ज्यात या स्मार्टफोनवर घसघशीत डिस्काउंट मिळत आहे. या स्मार्टफोनच्या 3GB+32GB वेरियंटची मूळ किंमत 11,990 रुपये इतकी आहे. मात्र फ्लिपकार्टवर यावर 1,000 रुपयांची सूट मिळत असून हा स्मार्टफोन तुम्ही 10,990 रुपयात खरेदी करु शकता. तसेच HDFC च्या कार्डधारकांना यांना या स्मार्टफोनवर अतिरिक्त 10% डिस्काउंट मिळत आहे. ज्यामुळे हा स्मार्टफोन तुम्हाला 9990 रुपयात उपलब्ध होऊ शकतो.

या स्मार्टफोनच्या डिस्प्ले विषयी बोलायचे झाले तर, यात 6.5 इंचाचा एचडी+ पंच होल डिस्प्ले, 90Hz चा रिफ्रेश रेट आणि 720x1,600 पिक्सल रिजोल्यूशनसह देण्यात आला आहे. त्यासोबत यात octa-core Qualcomm Snapdragon 460 हा प्रोसेसर आहे. स्मार्टफोनमध्ये 3GB रॅम आणि 32GB इंटरनल मेमरी देण्यात आली आहे. मायक्रो एसडी कार्डच्या मदतीने तुम्ही ही मेमरी 256GB पर्यंत वाढवू शकता.हेदेखील वाचा- Nokia 2.4 स्मार्टफोन लवकरच होणार भारतात लाँच, Xiaomi, Redmi ला टक्कर देणा-या या फोनची 'ही' असू शकतात खास वैशिष्ट्ये

त्याचबरोबर यात 13MP चा प्रायमरी कॅमेरा, 2MP चा डेप्थ कॅमेरा आणि 2MP चा मायक्रो शूटर कॅमेरा देण्यात आला आहे. त्याचबरोबर सेल्फीसाठी यात 8MP चा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. हा फोन अॅनरॉईड 10 वर आधारीत ColorOS 7.2 वर हा फोन कार्यरत आहे.

Oppo A33 मध्ये 5000 mAh ची बॅटरी 18W च्या फास्ट चार्जिंग सपोर्टसह देण्यात आली आहे. त्याचबरोबर या स्मार्टफोनमध्ये फिंगरप्रिंट सेन्सरही देण्यात आला आहे. या स्मार्टफोनचे वैशिष्ट्य म्हणजे यात 90Hz चा रिफ्रेश रेट (Refresh Rate) असणारा पंच होल डिस्प्ले (Punch-Hole Display), क्वॉलकॉम स्पॅनड्रगन 460 प्रोसेसर आणि 5,000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे.