भारतात लाँच झाले Fossil Gen 5E स्मार्टवॉच, किंमतीला साजेशी अशी आहेत या घड्याळाची खास वैशिष्ट्ये
Fossil Gen 5E Smartwatch (Photo Credits: Twitter)

Fossil कंपनीने भारतात आपला नवे स्मार्टवॉच लाँच केले आहे. Fossil Gen 5E असे या स्मार्टवॉचचे नाव असून या स्मार्टवॉचमध्ये त्याच्या किंमतीप्रमाणे खास अशी वैशिष्ट्ये देण्यात आली आहे. या स्मार्टवॉचला सर्वात ऑक्टोबर 2020 मध्ये अमेरिकेत लाँच करण्यात आले होते. या स्मार्टवॉचची किेंमत 18,495 रुपये इतकी आहे. यात AMOLED डिस्प्ले, क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 3100 चिपसेट देण्यात आला आहे. फोसिल कंपनी हे मनगटावरील घड्याळ्याच्या बाबतीत भारतातील अग्रगण्य कंपनीपैकी एक आहे. त्यामुळे या स्मार्टवॉचमध्ये तितकीच खास वैशिष्ट्ये असणार हे वेगळं सांगायची गरज नाही.

फोसिलची ही स्मार्टवॉच फास्ट चार्ज सपोर्ट, वॉटर रेजिस्टंस आणि हार्ट रेट मॉनिटरिंग सारख्या खास वैशिष्ट्यांसह लाँच केले गेले आहे. याआधी नोव्हेंबर 2019 मध्ये फोसिल Gen 5 स्मार्टवॉच भारतात लाँच केले होते.हेदेखील वाचा- Samsung Galaxy M12 स्मार्टफोन क्वॉड रियर कॅमरा सेटअप आणि 6000mAh बॅटरीसह लाँच; जाणून घ्या खास स्पेसिफिकेशन्स

Fossil Gen 5E स्मार्टवॉच ऑनलाईन शॉपिंग साइट फ्लिपकार्टवर विक्रीसाठी उपलब्ध आहे. याची सुरुवाती किंमत 18,495 रुपये इतकी आहे. फ्लिपकार्टसह या स्मार्टवॉचला कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवरुन देखील खरेदी केले जाऊ शकते. हे स्मार्टवॉच दोन डिस्प्ले साइज मध्ये येते. एक 44mm आणि दुसरे 42mm. Fossil Gen 5E स्मार्टवॉच सिलिकॉन, स्टेनलेस स्टील, लेदर आणि स्टेनलेस स्टील मॅश स्ट्रेप पर्यायासह खरेदी केला जाऊ शकतो.

हे स्मार्टवॉच गुगलच्या ऑपरेटिंग सिस्टम Wear OS वर चालते. Fossil Gen 5E स्मार्टवॉच स्मोक स्टेनलेस स्टील वेरियंट 5ATM वॉटर रेजिस्टंसह येते. तर दुसरे स्मार्टवॉच 3ATM वॉटर रेजिस्टंसला सपोर्ट करते. या स्मार्टवॉचमध्ये 1GB रॅम आणि 4GB चे स्टोरेज मिळते.

कनेक्टिव्हिटीसाठी Fossil Gen 5E मध्ये Bluetooth 4.2 LE, NFC आणि Wi-Fi दिला गेला आहे. या स्मार्टवॉचमध्ये एक्सेलेरोमीटर, जायरोस्कोप, off-body IR आणि PPG हार्ट रेट सेंसर दिला गेला आहे. हे स्मार्टवॉच 50 मिनिटांत 80% चार्ज होते. यात मल्टीपल बॅटरी मोड मिळतो, ज्यात डेली मोड, एक्सटेंड मोड, टाइम ओन्ली मोड आणि कस्टम बॅटरी मोड मिळतो. हे स्मार्टवॉच सिंगल चार्जवर 24 तासांचा बॅटरी बॅकअप देते.