Flipkart Honor Days Sale 2018 (File Photo)

ई-कॉमर्स कंपनी Flipkart ने चीनी स्मार्टफोन कंपनी Honor सोबत मिळून Flipkart Honor Days सेलचे आयोजन केले आहे. हा सेल 26 नोव्हेंबर ते 29 नोव्हेंबर दरम्यान असणार आहे. तीन दिवस चालणाऱ्या या सेलमध्ये Honor च्या निवडक स्मार्टफोन्सवर डिस्काऊंट ऑफर्स दिल्या जात आहेत. तर पाहुया Flipkart Honor Days Sale मध्ये कोणत्या स्मार्टफोन्सवर डिस्काऊंट ऑफर्स मिळत आहेत....

Honor 9 Lite

Honor 9 Lite हा मोबाईल कंपनीच्या भारतात सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या डिव्हाईसपैकी एक आहे. हा फोन तुम्ही 9,999 रुपये किंमतीत खरेदी करु शकता. या फोनमध्ये 5.65 इंचाचा फुल HD+ डिस्प्ले देण्यात आला आहे. तसंच यात ऑक्टाकोर किरीन 659 सोबत 3GB रॅम आणि 32GB इंटरनल स्टोरेज देण्यात आले आहे. यात 13+ 2 मेगापिक्सलचा ड्युल रिअर आणि फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. हा फोन 4G VoLTE ला सपोर्ट करतो. तसंच अॅनरॉईड ओरिओ 8.1 बेस्ड EMUI वर हा फोन काम करतो. यात 3,000 एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे.

Honor 10

या प्रिमियम स्मार्टफोनवर 11,000 रुपयांचे डिस्काऊंट ऑफर केले जात आहे. हा स्मार्टफोन 35,999 रुपये किंमतीत लॉन्च केला होता. मात्र Flipkart Honor Days Sale अंतर्गत हा स्मार्टफोन 24,999 रुपयांत खरेदी करता येईल. यात 5.84 इंचाचा फुल एचडी प्लस डिस्प्ले देण्यात आला आहे. किरीन 970 चिपसेट प्रोसेसरच्या या स्मार्टफोनमध्ये चांगला फिचर कॅमेरा देण्यात आला आहे. फोनमध्ये 24+16 मेगापिक्सलचा ड्युल रिअर कॅमेऱ्याशिवाय 24 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. हा फोन 4G VoLTE ला सपोर्ट करतो आणि अॅनरॉईड ओरिओ 8.1 बेस्ड EMUI वर काम करतो. या फोनमध्ये 3,400 एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे.

Honor 7S

Flipkart Honor Days Sale अंतर्गत हा स्मार्टफोन तुम्ही फक्त 5,999 रुपयांना खरेदी करु शकता. 8,999 रुपयांच्या किंमतीत लॉन्च झालेल्या या स्मार्टफोनवर 3,000 रुपयांची डिस्काऊंट ऑफर मिळत आहे. या स्मार्टफोनमध्ये 5.45 इंचाचा फुल एचडी प्लस डिस्प्ले देण्यात आला आहे. फोनमध्ये मीडियाटेक MT6739 चिपसेट प्रोसेसर देण्यात आला आहे. त्याचबरोबर फोनमध्ये 2GB रॅम आणि 16GB स्टोरेज देण्यात आले आहे. तसंच 13 मेगापिक्सलचा रिअर कॅमेरा आणि 5 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. फोनमध्ये 4G VoLTE ला सपोर्ट करतो आणि अॅनरॉईड ओरिओ 8.1 बेस्ड EMUI वर काम करतो. यात 3,020 एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे. याशिवाय Honor 7A तुम्ही 7,999 रुपयांत तर Honor 9i तुम्ही 12,999 रुपयांत खरेदी करु शकता.