iPhone तब्बल 17 हजार रुपयांनी स्वस्त, फ्लिपकार्ट कडून स्वातंत्र्यदिना निमित्त विशेष ऑफर
Best Smartphones in 2019 (Photo Credits: File)

अनेकांना आपल्या जवळ आयफोन (iPhone) असावा अशी इच्छा असते. पण आयफोनचे भाव म्हणजे गगनाला भिडलेले. सर्वसामान्यासाठी आयफोन खरीदनं म्हणजे स्वप्नचं. पण आता स्वातंत्र्यदिना (Independence Day) निमित्त फ्लिपकार्ट (Flipkart) आयफोनवर विशेष ऑफर (Offer) घेवून आला आहे. ज्या ऑफरनुसार तुम्हाला आयफोन एक दोन नाही तर तब्बल 17 हजार रुपयांनी स्वस्त मिळणार आहे. जर तुम्ही आयफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी ही योग्य वेळ आहे. एवढी मोठी सूट तुम्हाला पहिल्यांदाच मिळत आहे. पण फ्लिपकार्टवरुन देण्यात येणारी ही ऑफर प्रत्येकासाठी नाही. ही सवलत फक्त काही निवडक लोकांनाच देण्यात येणार आहे.

 

सध्या Apple iPhone 11 (64GB)  या फोनची MRP 49,900 रुपये आहे. तर फ्लिपकार्ट वरुन देण्यात येणारी ही ऑफर फक्त Apple iPhone 11 (64GB)  या मॉडेलवर देण्यात येणार आहे. या ऑफरनुसार प्लिपकार्टवर Apple iPhone 11 तब्बल 17 हजार रुपयांनी स्वस्त मिळणार आहे. म्हणजे Apple iPhone 11 खरेदी करण्यासाठी तुम्हाला केवळ 32 हजार 900 रुपये मोजावे लागणार आहे. पण फ्लिपकार्टच्या वतीने Apple iPhone 1 1वर एक्सचेंज (Exchange) ऑफरमध्ये 17 हजारांची सूटही दिली जात आहे. पण एवढ्या मोठ्या सवलतीचा लाभ घेण्यासाठी तुमचा जुना फोन चांगल्या असायला हवा. या ऑफर्सचा पूर्ण फायदा मिळाल्यास आयफोन स्वस्तात खरेदी करता येण शक्य आहे. (हे ही वाचा:- Whats App Update: आता 48 तासात केव्हाही, कुठलाही व्हॉट्सअॅप मेसेज डिलीट करण्याची मुभा; व्हॉट्सअॅपचा नवा अपडेट)

 

Apple च्या सर्वाधिक विक्री होणाऱ्या उत्पादनांच्या यादीत iPhone 11 चा समावेश करण्यात आला आहे. 6.1 इंच लिक्विड रेटिना एचडी डिस्प्ले (HD Display) iPhone 11 मध्ये उपलब्ध आहे. यात  12 MP + 12 MP डुअल कॅमेरा (Dual Camera) पर्याय मिळत आहे. यामध्ये 12 MP फ्रंट कॅमेरा (Front Camera) देण्यात आला आहे. फोनमध्ये A13 बायोनिक चिप प्रोसेसर देण्यात आला आहे. हे ड्युअल सिम (Dual Sim Support) सपोर्टसह येते. कनेक्टिविटीसाठी ड्युअल सिम सपोर्ट, स्पॅशियल ऑडियो आणि डॉल्बी एटमॉस चा सपोर्ट मिळतो.