Flipkart Flipstart Days Sale 2019 अंतर्गत कॅमेरा, लॅपटॉप, टीव्ही, मोबाईल आणि इतर प्रोडक्टर्सवर आकर्षक ऑफर्स
Flipkart Flipstart Days Sale 2019 (Photo Credits: Flipkart)

ई-कॉमर्स वेबसाईट्सवर ग्राहकांसाठी काही कालवधीनंतर सेल सुरु असतो. सणवार, खास दिवसाच्या निमित्ताने ई-कॉमर्स वेबसाईटवर सेलचे आयोजन केले जाते. आता पुन्हा एकदा फ्लिपकार्ट (Flipkart) नव्या सेलसह सज्ज झाला आहे. फ्लिपकार्टचा Flipstart Days Sale आजपासून सुरु होणार असून 3 एप्रिलपर्यंत चालणार आहे. या तीन दिवसांच्या सेलमध्ये स्मार्टफोन्स, इलेक्ट्रोनिक अप्लायन्सेस, गॅजेट आणि इतर प्रोडक्टर्सवर 80% डिस्काऊंट मिळत आहे. त्यामुळे यापैकी कोणतेही वस्तू खरेदी करण्याच्या विचारात असाल तर तुमच्यासाठी ही खास संधी आहे. फ्लिपकार्टने अॅक्सिस बँकेसोबत टायअप केल्यामुळे खरेदी दरम्यान अॅक्सिस बँकेच्या क्रेडिट, डेबिट कार्डचा वापर केल्याने तुम्हाला 10% पर्यंत डिस्काऊंट मिळेल.

या सेलअंतर्गत 34,990 रुपये आणि त्यावरील लॅपटॉप खरेदी केल्यास तुम्हाला ब्युटुथ हेडफोन्सवर 60% डिस्काऊंट मिळेल. फ्लिपकार्टवर कॅमेऱ्यांची किंमत 19,990 रुपयांपासून सुरु होत आहे. तर selling tablets 5499 रुपयांपासून उपलब्ध आहेत.

Flipkart ट्विट:

यासोबतच टेलिव्हीजन, एसी, वॉशिंग मशीन, फ्रिज आणि इतर प्रोडक्ट्सवर आकर्षक ऑफर्स दिल्या जात आहेत. तर अॅक्सिस बँकेच्या क्रेडिट, डेबिट कार्डचा वापर केल्याने तुम्हाला 10% पर्यंत डिस्काऊंट मिळेल. मात्र त्यासाठी तुम्हाला 2999 रुपयांची खरेदी करावी लागेल. ही ऑफर ग्रॉसरी शॉपिंगवरही उपलब्ध आहे. यासाठी ग्राहकांना 1499 रुपयांची ग्रॉसरी (किराणा सामान) शॉपिग करावी लागेल. याशिवाय फ्लिपकार्टच्या या सेलअंतर्गत EMI वर देखील आकर्षक ऑफर मिळत आहे.