Flipkart | File Photo

ई-कॉमर्स कंपनी फ्लिपकार्ट (Flipkart ) ने कोविड-19 संकटात (Covid-19 Pandemic) एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. फ्लिपकार्ट आणि मिंत्रा (Myntra) च्या सर्व कर्मचाऱ्यांच्या कोरोना लसीकरणाच खर्च कंपनीकडून करण्यात येणार आहे. लसीकरणाच्या पुढील टप्प्यामध्ये सर्व नागरिकांना लसीकरण देण्याची घोषणा होईल, अशी आशा फ्लिपकार्टने आपल्या कर्मचाऱ्यांशी बोलताना दर्शवली. (Flipkart in Marathi: फ्लिपकार्ट ग्राहकांसाठी आता मराठी भाषेचा पर्याय; मनसे लढा यशस्वी)

लसीकरणाच्या पुढील टप्प्याबद्दल सरकारच्या निर्णयाची आम्ही  सर्व वाट पाहत आहोत. परंतु, फ्लिपकार्ट आणि मिंत्रा च्या सर्व कर्मचाऱ्यांच्या लसीकरणाचा 100 टक्के खर्च कंपनीकडून करण्यात येईल. लस घेतल्यानंतर त्या लसीच्या खर्चाचे पैसे कर्मचारी कंपनीकडून reimburse करु शकता किंवा कंपनीच्या पार्टनर हॉस्पिटलमध्ये मोफत लसीचा लाभ घेऊ शकता, असे कंपनीकडून सांगण्यात आले आहे. दरम्यान, लसीकरणाच्या पुढील टप्प्यात कंपनी कॅम्पसमध्ये जर लसीकरण आयोजित केले तर सर्व कर्मचारी तेथून लस घेऊ शकतील.

कोविड-19 ची लस घेण्यासाठी सर्व कर्मचाऱ्यांना एक दिवसाची सुट्टी मिळू शकते. जर कुठल्या कर्मचाऱ्याला लसीकरणानंतर काही दुष्परिणाम झाल्यास त्याला कोविड स्पेशल केअर लिव्ह सुद्धा मिळू शकते. कोरोना संकटापासून बाहेर पडण्यासाठी लसीकरण हे एकमेव साधन सध्या आपल्याकडे उपलब्ध आहे. लस घ्यायची की नाही हा पूर्णपणे कर्मचाऱ्यांचा निर्णय असेल. परंतु, लसीकरणाचे फायदे लक्षात घेता तुम्ही तुमच्या आणि कुटुंबियांच्या फायद्यासाठी योग्य निर्णय घ्याल, अशी आशा आहे, असे फ्लिपकार्टचे चिफ पिपल ऑफिसर कृष्णा राघवन म्हणाले.

सोमवारी आयटी फर्म माईंड ट्री आणि सीफी टेक्नॉलॉजीस यांनी देखील आपले कर्मचारी आणि त्यांच्या परिवाराच्या लसीकरणाचा खर्च उचलण्याची घोषणा केली. यांच्यासोबतच इन्फोसिस, अॅक्सेंजर, कॅबजेमिनी, रिलायन्स इंडस्ट्रीज, टीव्हीएस मोटार कंपनी आणि रिन्यूव्ह पॉवर या मोठ्या कंपन्यांनी देखील त्यांच्या कर्मचारी आणि कुटुंबियांच्या यांच्या लसीकरणाचा खर्च उचलण्याचे जाहीर केले.