Flipkart Big Billion Days Sale च्या शेवटच्या दिवशी iPhone 12 कमी किंमतीत खरेदी करण्याची संधी; पहा काय आहे ऑफर
Apple iPhone 12 (Photo Credits: Apple)

आयफोन 13 (iPhone 13) लॉन्च झाल्यानंतर लगेचच अॅपल आयफोन 12 (Apple iPhone 12) वर डिस्काउंट सुरु झाला. फ्लिपकार्ट बिग बिलियन डेज सेल (Flipkart Big Billion Days Sale) दरम्यान आयफोन 12 कमी किंमतीत खरेदी करण्याची संधी उपलब्ध झाली आहे. फ्लिपकार्टवर आयफोन 12 वर 12,901 रुपयांचा डिस्काउंट मिळत आहे. आयफोन 12 चा 64GB व्हेरिएंट 52,999 किंमतीला उपलब्ध आहे, तर 128GB व्हेरिएंट 57,999 रुपयांना उपलब्ध आहे. आयफोन 12 चे सर्व रंग खरेदीदारांसाठी उपलब्ध नसतील.

आयफोन 12 खरेदी करताना एक्सचेंज ऑफर चा पर्याय निवडल्यास किंमत आणखी कमी होऊ शकते. फ्लिपकार्ट iPhone 12 वर एक्सचेंज ऑफर अंतर्गत 15,600 पर्यंत सूट देत आहे. यामुळे हा स्मार्टफोन ग्राहकांना अगदी 37,399 पर्यंत मिळू शकतो.

फ्लिपकार्ट बिग बिलियन डेजची विक्री 3 ऑक्टोबर पासून सुरू झाली. सेलची विक्री 10 ऑक्टोबर रोजी मध्यरात्री संपेल. तोपर्यंत खरेदीदार नवीन आयफोन 12 ऑफरचा लाभ घेऊ शकतात.

खरेदीदार कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवर आयफोन 12 च्या प्रत्येक खरेदीसह मोफत एअरपॉड्स किंवा एअरपॉड्स प्रो वर मोठ्या प्रमाणात सूट मिळवू शकतात. परंतु कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवर आयफोन 12 ची किंमत फ्लिपकार्ट ऑफरपेक्षा खूपच जास्त आहे. दिवाळी ऑफर म्हणून अँपलेतर्फे मोफत एअरपॉड्स सुद्धा खरेदीदाराना मिळणार आहे .

आयफोन 12 मध्ये बायोनिक A14 प्रोसेसर आहे. हा फोन 64GB, 128GB आणि 256GB या तीन व्हेरियन्टमध्ये उपलब्ध आहे. आयफोन 12 हा सहा वेगवेगळ्या रंगामध्ये उपलब्ध आहे .