Flipkart (PC - Facebook)

फ्लिपकार्टने अधिकृतपणे वर्षातील सर्वात मोठ्या सेलचा म्हणजेच बिग बिलियन डेज 2024 (Flipkart Big Billion Days Sale 2024) चा टीझर रिलीज केला आहे. अहवालानुसार, फ्लिपकार्ट बिग बिलियन डेज 2024 सेल प्लस सदस्यांसाठी 29 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे आणि इतर वापरकर्त्यांसाठी तो 30 सप्टेंबर लाइव्ह होईल. गेल्या वर्षीचा बिग बिलियन डेज सेल ऑक्टोबरमध्ये सुरू झाला होता. हा सेल सहसा दिवाळीच्या सणावेळी लाइव्ह केला जातो, मात्र यंदा हा सेल थोडा लवकर सुरु होईल.

फ्लिपकार्टचा बिग बिलियन डेज सेल ग्राहक इलेक्ट्रॉनिक्स, फॅशन, होम अप्लायन्सेस आणि इतर अनेक उत्पादनांवर उत्तम सौदे आणि सूट देण्यासाठी ओळखला जातो. अनेक युजर्सच्या मते, आगामी सेलची झलक फ्लिपकार्ट ॲपवरही दिसली आहे.

वॉलमार्टच्या मालकीचे ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म फ्लिपकार्ट सेलमध्ये ॲक्सिस बँक क्रेडिट कार्ड वापरकर्त्यांना 5 टक्के अतिरिक्त सूट मिळेल. त्याच वेळी, फ्लिपकार्ट पे लेटरद्वारे, तुम्हाला 1,00,000 रुपयांपर्यंतची क्रेडिट लाइन आणि सुपर कॉईन वापरून निवडक उत्पादनांवर अतिरिक्त सूट मिळेल. बिग बिलियन डेज सेल सुरू झाल्यापासून, फ्लिपकार्ट सर्वात लोकप्रिय स्मार्टफोन्सवर, विशेषत: ऍपल, सॅमसंग, गुगल इत्यादी ब्रँडच्या फ्लॅगशिप डिव्हाइसेसवर मोठी सूट मिळण्याची शक्यता आहे. म्हणून, जर तुम्ही नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर, बिग बिलियन डेज 2024 पर्यंत प्रतीक्षा करणे चांगले आहे. (हेही वाचा; YouTube Premium Price Hike: भारतामधील ग्राहकांसाठी यूट्यूबचा झटका; प्रीमियम योजनांच्या किमती वाढवल्या, जाणून घ्या नवे दर)

फ्लिपकार्टने अद्याप आपल्या अधिकृत X हँडलवर ही माहिती दिलेली नाही, मात्र ता सेलबाबत ही माहिती नुकतीच गुगल सर्जमधून समोर आली आहे. कोणत्या उत्पादनावर किती डिस्काउंट ऑफर मिळणार आहे, याचीही माहिती येत्या काही दिवसांत समोर येण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, फ्लिपकार्टच्या बिग बिलियन डेज सेलच्या घोषणेनंतर, ऍमेझॉन लवकरच ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेलची घोषणा करू शकते.