iPhone 13 लॉन्च पूर्वी  Flipkart ने जाहीर केली Apple iPhone 12 वर आकर्षक सूट
iphone (Photo Credits: File Photo)

अ‍ॅपल (Apple)  कंपनी येत्या 14 सप्टेंबरला iPhone 13 Series लॉन्च करण्याची शक्यता आहे. कंपनीकडून 14 सप्टेंबरला एका इव्हेंटची घोषणा करण्यात आली आहे. iPhone 13 Series मध्ये iPhone 13 Mini, iPhone 13 Pro, iPhone 13 आणि iPhone 13 Pro Max यांचा समावेश असण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पण या नव्या फोनच्या लॉन्चची तयारी सुरू असताना आता आयफोन 12 वर फ्लिपकार्टने (Flipkart) घसघशीत सूट जाहीर केली आहे. मग तुम्ही आयफोन 12 घेण्यासाठी उत्सुक असाल तर सध्या या मर्यादित वेळेसाठी जाहीर केलेल्या सेलचा नक्कीच फायदा घेऊ शकता.

अ‍ॅपल iPhone 12 हा 3 स्टोरेज ऑप्शनमध्ये उपलब्ध आहे. 64GB, 128GB आणि 256GB. 64GB व्हेरिएंट हा सध्या Rs 66,999 तर 128GB आणि 256GB हा प्रत्येकी 71,999 आणि 81,999 रूपयांना उपलब्ध आहे. इथे पहा अ‍ॅपल iPhone 12 ची सविस्तर वैशिष्ट्यं. 

Apple iPhone 12 (Photo Credits: Flipkart)

iPhone 12 स्मार्टफोन हा बेस व्हेरिएंट साठी Rs 79,990 ला लॉन्च करण्यात आला होता. तर हाय एंड मॉडेल हे Rs 94,900 ला उपलब्ध होते. स्पेसिफिकेशन पाहता iPhone 12 मध्ये 6.1-inch Super Retina XDR OLED डिस्प्ले आहे. 2532x1170 pixels रेझुलेशन आहे. 5G कनेक्टिव्हिटी असणारा हा पहिला आयफोन असल्याने अनेक लोकांमध्ये याची प्रचंड उत्सुकता आहे.