iPhone 12 Series (Photo Credits: Apple)

मोबाईलच्या दुनियेत संपूर्ण जगात भक्कम पाय रोवून असलेल्या अॅप्पल (Apple) कंपनीचा आयफोन (iPhone) असावा असे अनेक भारतीयांचे स्वप्न असते. काहींसाठी हा प्रतिष्ठेचा विषय असतो तर काहींना आयफोन आवडतो म्हणून. त्यामुळे भारतात अॅप्पलचे एकाहून एक सरस आयफोन बाजारात आले आहेत. मात्र गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या iPhone 12 अनेक जण आतुरतेने वाट पाहात होते. त्या आयफोन प्रेमींची प्रतिक्षा अखेर संपली असून भारतात iPhone सीरिज लाँच झाली आहे. यात iPhone 12 Mini, iPhone 12, iPhone 12 Pro आणि iPhone 12 Pro Max यांचा समावेश आहे. आयफोन 12 या सीरिजचे खास वैशिष्ट्य म्हणजे 5G कनेक्टिव्हिटी असणारे हे पहिले आयफोन आहेत.

अॅप्पलच्या iPhone 12 सीरिजचे iPhone 12 Mini, iPhone 12, iPhone 12 Pro आणि iPhone 12 Pro Max मध्ये जबरदस्त स्टोरेज, कॅमेरा आणि बॅटरी लाईफ देण्यात आली आहे.

हेदेखील वाचा- Apple कंपनीचे दिवाळी गिफ्ट ऑफर, iPhone 11 खरेदीवर फ्री मिळणार 'हे' शानदार डिवाइस

नाव iPhone 12 Mini  iPhone 12  iPhone 12 Pro   iPhone 12 Pro Max
डिस्प्ले  5.4 इंच 6.1 इंच (सुपर रेटिना XDR OLED) 6.5 इंच (सुपर रेटिना XDR OLED) 6.7 इंच
प्रोसेसर ए-14 बायोनिक प्रोसेसर ए-14 बायोनिक प्रोसेसर ए-14 बायोनिक प्रोसेसर ए-14 बायोनिक प्रोसेसर
स्टोरेज 64GB/ 128GB/ 256GB  128GB, 256GB,  512GB  128GB, 256GB,  512GB  128GB, 256GB,  512GB
 कॅमेरा 12MP+12MP 12MP+12MP 12MP+12MP+12MP 12MP+12MP+12MP
किंमत 51100 (अंदाजे) 58400  (अंदाजे) 73,936 (अंदाजे) 80350 (अंदाजे)

5G कनेक्टिव्हिटी असणारा हा पहिला आयफोन असल्याने अनेक लोकांमध्ये याची प्रचंड उत्सुकता होती. या आयफोनचे डिझाईन्स जितके दमदार आहे तितकीच त्याची वैशिष्ट्ये देखील खास आहेत.

iPhone mini आणि iPhone 12 ची प्री-बुकिंग 6 नोव्हेंबरला होणार आहे. तर 13 नोव्हेंबरला विक्रीसाठी उपलब्ध होईल. तर iPhone 12 Pro आणि iPhone 12 Pro Max ची प्री-बुकिंग 16 ऑक्टोबरच्या दरम्यान होईल. तर 23 ऑक्टोबरला विक्रीसाठी उपलब्ध होईल.

Apple च्या या इव्हेंटमध्ये Apple HomePodmini देखील लाँच करण्यात आला. या होमपॉडची किंमत 7200 रुपये इतकी आहे. या स्पीकरचा आकार 3.3 इंचाचा असून Apple S5 प्रोसेसर सह येतो. याची 6 नोव्हेंबर पासून त्याची प्री-बुकिंग सुरु होणार असून 16 नोव्हेंबरला विक्रीसाठी उपलब्ध होईल.