Twitter logo (Photo courtesy: Twitter)

ट्वीटर (Twitter) वर ट्वीट एडीट (Tweet Edit) करण्याचा पर्याय असावा अशी युजर्सची मागील अनेक वर्षांपासून मागणी होती. आता अखेर ही मागणी पूर्ण होत असल्याची चिन्हं आहेत. ट्विटर ब्लू अकाऊंट कडून या फीचरचे टेस्टिंग झाल्याचं म्हटलं आहे. त्याचं एक ट्वीट देखील पोस्ट करण्यात आले आहे. यामध्ये ट्वीटला शेवटचं कधी एडीट करण्यात आलं याची तारीख, वेळ दिसते. ट्वीटरने आयफोन अ‍ॅप वरून ट्वीट केल्याचं पहायला मिळत आहे.

ट्वीटरने सुरूवातीला दिलेल्या माहितीनुसार, 21 सप्टेंबर पासून या एडीट ट्वीट ची पब्लिक टेस्टिंग सुरू केली जाईल. त्यावेळी असं देखील सांगण्यात आले होते की हे फीचर केवळ ट्वीटर ब्लू सब्सक्राईबर्सना मिळणार आहे. ही ट्वीटरची प्रिमियम सर्व्हिस आहे. यामध्ये एक्स्ट्रा फीचर्स मिळतात.

ट्वीट एडीट केल्यानंतर त्यावर लास्ट एडिटेड टॅग असणार आहे. त्यामध्ये तारीख, वेळ दिसेल. त्यावर क्लिक करून एडीट हिस्ट्री पाहता येईल. 'लेटेस्ट ट्वीट' आणि 'व्हर्जन हिस्ट्री' मध्ये ट्वीटचं नवं, जुनं व्हर्जन पाहता येईल.

ट्वीटरच्या माहितीनुसार, कोणतेही ट्वीट कमाल 5 वेळेस एडीट करण्याचा पर्याय असेल. एडीटचा पर्याय ट्वीट केल्यानंतर 30 मिनिटांपर्यंतच उपलब्ध असणार आहे. ट्वीटर ब्लू सब्सक्रिप्शनसाठी युजर्सना दरमहा 400 रूपये मोजावे लागणार आहेत.