शिख धर्मियांच्या भावना दुखावल्याच्या आरोप लावत Amazon च्या विरोधात गुन्हा दाखल
प्रतिकात्मक फोटो (Photo Credit: BussinessSuiteOnline.com)

दिल्लीतील शिखांच्या गुरुद्वाराचे प्रमुख कमेटी (डीएसजीएमसी) मनजिंदर सिंह सिरसा यांनी शिख धर्मियांच्या भावना दुखावल्याचा आरोप लावला आहे. त्याचसोबत अॅमेझॉन इंडियाच्या विरोधात प्राथमिक स्वरुवात गुन्हा सुद्धा दाखल केला आहे. त्यांनी कंपनीवर असा आरोप लावला आहे की, एका विक्रेत्याने त्याच्या प्लॅटफॉर्मवर स्वर्ण मंदिरचे चित्र असलेल्या टॉयलेट मॅट्स विक्री करत असल्याचे म्हटले आहे. कंपनीवर यापूर्वी सुध्दा अशाप्रकारचा आरोप लगावण्यात आला होता. सिरसा यांनी ट्वीटरनर काही फोटो ही पोस्ट केले आहेत. त्यामध्ये बाथरुमच्या आतमध्ये टॉयलेट मॅट्स असून त्यावर स्वर्ण मंदिराचे फोटो आहे. यावरुन अॅमेझॉन या प्रकरणी किती हलगर्जीपणा करत असल्याची टीका केली आहे.

सिरसा यांनी ई-कॉमर्स कंपनीला असे म्हटले आहे की, विक्रेत्याला अॅमेझॉनवर विक्री करण्यास बंदी आणावी. त्याचसोबत माफीनामा सुद्धा त्याने जाहीर करावा.यापूर्वी 2018 मध्ये सुद्धा कंपनी अशा प्रकारच्या वादात अडकली होती. त्यावेळी डोरमॅट्सस रग्स आणि टॉयलेटचे सामान विक्री करण्यात आले होते. ज्यामध्ये स्वर्ण मंदिराचे फोटो दिसून आले होते. त्यावेळी सुद्धा शिख धर्मियांनी या प्रकाराचा संताप व्यक्त करत विरोध केला होता. (Paytm आणि Google Pay च्या माध्यमातून होतेय नागरिकांची फसवणूक, तुम्ही सावधगिरी बाळगा)

ई-कॉमर्स वेबसाईटवर प्राईज वॉर रोखण्यासाठी केंद्र सरकारने2018 मध्ये महासेलवर बंदी घातली होती. सरकारने अॅमेझॉन (Amazon) आणि फ्लिपकार्ट (Flipkart) यांसारख्या ऑनलाईट रिटेल कंपन्यांसंबंधित नियमात काही बदल केले होते. या अंतर्गत ई-कॉमर्स वेबसाईटवर भागीदारी असलेल्या कंपन्यांचे प्रॉडक्ट्स विकता येणार नाहीत. परिणामी महासेल अंतर्गत जबरदस्त डिस्काऊंटवर परिणाम झाला होता.