FAU-G Mobile गेम 26 जानेवारी रोजी होणार लॉन्च; 40 लाखाहून अधिक युजर्सची पसंती
FAU-G (photo Credits-Twitter)

बहुप्रतिक्षित FAU-G mobile गेम प्रजासत्ताक दिन (Republic Day) म्हणजेच 26 जानेवारी रोजी भारतात लॉन्च होणार आहे. हा गेम बंगलोर स्थित nCore Games या कंपनीने विकसित केला असून ऑनलाईन गेमिंगच्या मार्केटमध्ये उतरण्यासाठी हा गेम पूर्णपणे तयार असल्याचा विश्वास कंपनीने व्यक्त केला आहे. Fearless And United Guards (FAU-G) असा या गेमचा फुलफॉर्म असून भारत आणि चीनमध्ये गेल्या चार दशकापासून होणाऱ्या गलवान व्हॅलीच्या युद्धावर आधारीत आहे.

या FAU-G गेमप्ले मध्ये विविध मिशन्स आणि एपिसोड्स असून ते पूर्ण केल्यावर स्टोरीच्या पुढच्या स्टेजला पोहचता. FAU-G गेमचा APK अजून डाऊनलोडसाठी रिलीज झालेला नाही. परंतु, गेमसाठी 40 लाखाहून अधिक युजर्सने प्री-रजिस्ट्रेशन केलं आहे.

बंगळुरु स्थित nCore Games कंपनीने हा गेम गेल्या वर्षी नोव्हेंबर मध्ये लॉन्च करण्याचा निर्णय घेतला होता. परंतु, काही कारणांमुळे या गेमचे लॉन्चिंग पुढे ढकलण्यात आले. हा गेम लॉन्च झाल्यानंतर युजर्स आपल्या डिव्हाईसेसमध्ये गेम डाऊनलोड करुन खेळू शकतील, लॉन्चिंगनंतर गुगल प्ले स्टोअर आणि ऑफिशियल वेबसाईटवरु युजर्स FAU-G गेम डाऊनलोड करु शकतील.

ऑफिशियल साईटवरुन FAU-G गेम डाऊनलोड केल्यास युजर्संना त्याची APK मिळेल आणि त्याचे मॅन्युअल इस्टॉलेशन करावे लागेल. या गेमची लोकप्रियता वाढल्यास कमी कॉन्फ्रिग्रेशन असलेल्या डिव्हाईसेसाठी गेमचा लाईट व्हर्जन काढण्यात येईल. (Akshay Kumar ने आपल्या अ‍ॅक्शन गेम FAU-G चं अॅन्थम सॉन्ग केलं रिलीज; पहा जबरदस्त व्हिडिओ)

दरम्यान, चीनच्या पबजी मोबाईल गेमवर बंदी घातल्यानंतर गेमप्रेमी काहीसे निराश होते. त्यानंतर बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार याने FAU-G गेमची घोषणा केली. हा गेम पबजी प्रमाणेच असून भारतीय आहे.