Facebook वर चित्रपटांच्या जाहिरातींसोबत आता दिसणार Show Time, नोटिफिकेशनमधून मिळणार सूचना
Representation Image (Photo Credits: Cnet)

फेसबुकवर (Facebook) आता चित्रपटांच्या जाहिरातींसबोत आता त्यांचे शो टाइमसुद्धा दिसणार आहेत. फेसबुककडून लॉन्च करण्यात येणाऱ्या या दोन फिचर्सला मुव्ही रिमांडर अॅड्स आणि मुव्ही शो-टाइम असे नाव देण्यात आले आहे. सिनेमागृहात जाऊन चित्रपट पाहणाऱ्या प्रेक्षकांना एखाद्या चित्रपटाचा ट्रेलर आल्यानंतर त्याचा शो कुठे कुठे लागला आहे याची उत्सुकता लागून राहिली असते. तर काही वेळेस फक्त ट्रेलर बघून चित्रपटाची प्रदर्शित तारिख विसरुन जातात. त्यामुळे आता फेसबुकच्या नव्या फिचर्समुळे याबद्दल नोटिफिकेशनमधून सूचना मिळणार आहे.

फेसबुक मुव्ही रिमांडर अॅड हे फेसबुक युजर्सला एखादा चित्रपट केव्हा प्रदर्शित होणार आहे याची सूचना देणार आहे. त्याचसोबत फेसबुकवर चित्रपटाची जाहिरात पाहण्यासाठी युजर्सला Interested ऑप्शनवर क्लिक केल्यावर त्याची सूचना मिळणार आहे. एवढेच नाही तर चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर फेसबुकवर त्याचे नोटिफिकेशन पाठवण्यात येणार आहे. यामुळे आता युजर्स फर्स्ट डे, फर्स्ट शो तुम्ही चुकवू शकणार नाहीत. सध्या हे फिचर युएस आणि युके मध्ये लॉन्च करण्यात आले आहे.(Twitter लवकरच सादर करणार 'Hide Replies' हे नवं फिचर; ट्रोलिंगला बसणार चाप)

या फिचरच्या माध्यमातून युजर्सला नोटिफिकेशन मिळण्यासोबत चित्रपटाच्या संबंधित सर्व माहिती दिली जाणार आहे. त्याचसोबत चित्रपटाच्या तिकिटसुद्धा युजर्सला येथून बुक करता येणार आहेत. तर मुव्ही शो टाइम अॅड्सच्या माध्यमातून प्रदर्शित झालेल्या चित्रपटांची माहिती मिळणार आहे.