18,000mAh बॅटरी असणारा 'हा' स्मार्टफोन देणार 7 दिवसांचा बॅकअप
Energizer Power Max P18K Pop (Photo Credits-Twitter)

Mobile World Congress यांनी विविध गॅजेट्स लॉन्च केले आहेत. त्यातील एक म्हणजे Energizer Power Max P18K Pop आहे. या स्मार्टफोनची बॅटरी 18,000mAh असून तो जाड स्वरुपाचा आहे. तर निळ्या रंगामध्ये हा फोन ग्राहकांना उपलब्ध करुन देण्यात आला आहे.

या फोनची स्क्रिन 6.2 इंच असून यामध्ये पॉप अप कॅमेरा देण्यात आला आहे. तसेच सेल्फीसाठी एक नाही तर दोन कॅमेरे देण्यात आले आहेत. या स्मार्टफोनच्या बॅटरीचा एक फायदा म्हणजे एकदा चार्ज केल्यानंतर तुम्हाला आठवडाभर हा स्मार्टफोन चार्ज केला नाही तरी चालणार आहे. त्याचोसबत सातत्याने 48 मिनिटांपर्यंत व्हिडिओ पाहू शकणार आहात. स्मार्टफोनसाठी 6GB RAM आणि 128Gb इंनटर्नल मेमरी देण्यात आली आहे. MediaTek चे प्रोसेसर देण्यात आले असून तो Android 9 Pie वर काम करतो. तसेच स्मार्टफोन चार्ज करण्यासाठी 8 तास लागणार असल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले आहे.

कंपनी हा स्मार्टफोन लवकरच लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. तसेच पुढील दोन महिन्यात लॉन्च करणार असून अद्याप भारतात लॉन्च करण्याबाबत स्पष्ट करण्यात आलेले नाही. परंतु येत्या काही काळात हा स्मार्टफोन भारतातही लॉन्च केला जाण्याची शक्यता कंपनीने वर्तवली आहे.