ChatGPT Vs TruthGPT: एलन मस्क लवकरच सुरु करणार एआय प्लॅटफॉर्म; 'ट्रुथजीपीटी'च्या माध्यातून 'चॅट जीपीटी'ला आव्हान मिळण्याची शक्यता
Elon Musk, ChatGPT | (Photo courtesy: archived, edited, symbolic images)

एआय प्लॅटफॉर्म (AI platform) चॅट जीपीटी (ChatGPT) आले आणि डिजिटल विश्वात नव्या क्रांतीचे पाऊल टाकले गेले. त्यामुळे जगभरातील सर्च इंजिन आणि मायक्रोब्लॉगिंग सेवा पूरविणाऱ्या कंपन्याही अशी सेवा पूरविण्याबाबत गांभीर्याने विचार करु लागल्या. त्याचेच एक उदाहरण म्हणजे ट्विटरचे सीईओ, मालक आणि अब्जाधीश एलन मस्क (Billionaire Elon Musk). होय, एलन मस्क यांनी नुकतीच घोषणा केली आहे की, ते लवकच 'ट्रुथजीपीटी' एआय प्लॅटफॉर्म( TruthGPT AI Platform) सुरु करत आहेत. रॉयटर्सने याबाबत फॉक्स न्यूजच्या हवाल्याने वृत्त दिल्याचे वृत्तसंस्था एएनआयने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

वृत्तात म्हटले आहे की, मस्क यांनी म्हटले आहे की, ते लवकरच 'TruthGPT' लॉन्च करतील. हे ChatGPT, OpenAI मधील लोकप्रिय चॅटबॉटला उघड आव्हान देऊ शकेल. फॉक्स न्यूज चॅनलच्या टकर कार्लसनशी बोलताना मस्क यांनी म्हटले की, आपण काहीतरी नवे सुरु करणार आहोत. जे विश्वाचा आणि सत्याचा अधिक शोध घेताना दिसेल. ज्याला मी 'TruthGPT' म्हणतो. (हेही वाचा, Parag Agrawal यांच्यासह 3 माजी ट्विटर अधिकाऱ्यांनी एलोन मस्कवर दाखल केला खटला; काय आहे नेमकी प्रकरण? जाणून घ्या)

एलन मस्क पुढे बोलताना सांगतात की, TruthGPT किंवा ओपन एआय हा विश्व समजून घेण्याचा एक भाग आहे. त्यामुळे मानवी जीव अथवा मनुष्य प्रजाती किंवा त्याच्या बुद्धीमत्तेला अजिबात धोका नाही. तो एक विश्वातील मनोरंजनाचा भाग आहे. आणि मला वाटते तो एक सुरक्षीत आणि चांगला मार्ग आहे.

ट्विट

काय आहे चॅट जीपीटी?

ChatGPT हे GPT (जनरेटिव्ह प्री-ट्रेन्ड ट्रान्सफॉर्मर) आर्किटेक्चरवर आधारित OpenAI द्वारे विकसित केलेले एक मोठे भाषा मॉडेल आहे. जे इंटरनेटवरून मोठ्या प्रमाणावर मजकुरावर प्रशिक्षित केले गेले आहे आणि विविध सूचना आणि प्रश्नांना मानवासारखे प्रतिसाद निर्माण करण्यास शिकले आहे. ChatGPT चा वापर विविध नैसर्गिक भाषा प्रक्रिया कार्यांसाठी केला जाऊ शकतो. जसे की भाषा भाषांतर, मजकूर सारांश आणि संभाषण निर्मिती. एक भाषा मॉडेल म्हणून, ChatGPT नैसर्गिक भाषा समजून घेण्यासाठी आणि मानवासारख्या संभाषणाचे अनुकरण करून योग्य प्रतिसाद निर्माण करण्यासाठी डिझाइन केले आहे.