Elon Musk (संग्रहित संपादित प्रतिमा)

टेस्लाचे सीईओ आणि जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती एलोन मस्क (ELon Musk) यांनी मायक्रो-ब्लॉगिंग साइट ट्विटरसोबतच्या कायदेशीर लढाईदरम्यान, स्वतःचा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म सुरु करण्याचे संकेत दिले आहेत. एका ट्विटर वापरकर्त्याला दिलेल्या उत्तरात मस्क यांनी ट्विटरसाठी बॅकअप प्लॅन म्हणून X.com नावाची नवीन सोशल मीडिया साइट सुरू करण्याचे संकेत दिले आहेत. परंतु त्याचे नक्की नाव काय असेल, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.

अशाप्रकारे एलॉन मस्क यांची मायक्रोब्लॉगिंग साइट ट्विटरसोबतची डील न्यायप्रविष्ट असताना, एका नव्या सोशल मिडियाबाबत माहिती समोर आली आहे. एलॉन मस्कची नवी साइट ट्विटरला टक्कर देईल असा दावा अनेक रिपोर्ट्समध्ये करण्यात आला आहे. नेहमीच इतरांपेक्षा वेगळे काही करण्यासाठी धडपडत असलेल्या एलॉन मस्कच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मची कल्पनादेखील इतरांपेक्षा खूपच वेगळी असेल. एएनआय या वृत्तसंस्थेने ही माहिती दिली आहे.

मंगळवारी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एका वापरकर्त्याने एलॉन मस्कला विचारले की, जर ट्वीटरची डील झाली नाही तर, तो स्वतःचे सोशल मीडिया व्यासपीठ तयार करेल का? या ट्विटला उत्तर देताना ट्विटरवर नेहमीन सक्रिय असलेल्या मस्कने X.com असे लिहिले. X.com हे एका स्टार्टअपचे डोमेन नाव होते, जे दोन दशकांपूर्वी मस्कने तयार केले होते. त्यानंतर ते आर्थिक सेवा कंपनी PayPal मध्ये विलीन करण्यात आले. (हेही वाचा: WhatsApp Feature Updates: व्हॉट्सअ‍ॅप कडून प्रायव्हसी फीचर्स मध्ये अपडेट; Online Presence आणि स्क्रिनशॉर्ट्स बाबत होणार बदल)

दुसरीकडे, ट्विटरवरील एका वापरकर्त्याने ट्विटर डील पूर्ण न झाल्यास तुम्ही टेस्लाचे शेअर्स पुन्हा खरेदी कराल का? असे विचारले असता, मस्कने ‘हो’ असे उत्तर दिले आहे. नुकतेच मस्कने त्याच्या इलेक्ट्रिक वाहन कंपनीतील सुमारे $ 7 अब्ज शेअर्स विकले आहेत. यासह स्पेसएक्समध्येही इलॉन मस्कचे शेअर्स आहेत, जे स्पेस टुरिझम साकार करण्यासाठी खूप प्रयत्न करत आहेत. यासोबतच कंपनी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकापर्यंत सामान पोहोचवण्याचे काम करते. ही कंपनी नासासोबत काम करत आहे.