E-Textile Technology: आता चक्क परिधान केलेल्या कापडाद्वारे चार्ज करू शकाल तुमचा फोन; बाजारात आले ई-टेक्सटाइल तंत्रज्ञान
E-Textile Technology (प्रातिनिधिक व संग्रहित-संपादित प्रतिमा)

सध्या तंत्रज्ञानाच्या (Technology) बाबतीत जगाने खूप मोठी प्रगती केली आहे. आपण कल्पनाशी करू शकत नाही अशा गोष्टी समोर येत आहेत. तंत्रज्ञानामुळे आपले जीवनही बदलले आहे. आजकालच्या जमान्यात आपण सर्वजणच स्मार्टफोन वापरतो आणि ते चार्ज करण्यासाठी आपल्यासोबत नेहमी चार्जरही बाळगतो. परंतु हे चार्जर लवकरच डिस्चार्ज होणार आहेत. काही कालावधीनंतर कदाचित कंपन्या तुम्हाला स्मार्टफोनसोबत चार्जर देऊ करणार नाहीत, कारण सध्या बाजारात E-Textile नावाचे तंत्रज्ञान धुमाकूळ घालत आहे.

या ई-टेक्सटाइल तंत्रज्ञानामुळे तुमचे कपडे तुमचा स्मार्टफोन चार्ज करतील. ई-टेक्सटाइल हे एक खास फॅब्रिक आहे, जे सामान्य कपड्यांपेक्षा खूप वेगळे आहे. तुम्ही ते परिधान करण्यासाठी वापरू शकालच, परंतु त्याचा खरा वापर तुमचा स्मार्टफोन चार्ज करण्यासाठी होईल. हे कापड स्वतःमध्ये सौरऊर्जा साठवून ठेवते आणि तुम्ही जेव्हा हवे तेव्हा ते वापरू शकाल, म्हणजेच याद्वारे तुम्ही तुमचा स्मार्टफोन चार्ज करू शकता. कापड जेवढे मोठे असेल तेवढी जास्त सौरऊर्जा साठवली जाईल आणि तुम्ही तुमचा स्मार्टफोन अधिक वेळा चार्ज करू शकाल. (हेही वाचा: Google Chrome Update: लवकरच 'या' लॅपटॉप आणि कॉम्प्युटरवर गुगल क्रोम बंद होण्याची शक्यता; जाणून घ्या सविस्तर)

नॉटिंगहॅम ट्रेंट युनिव्हर्सिटीच्या शास्त्रज्ञांनी हे खास कापड तयार केले आहे, जे आजपर्यंत अगदी काल्पनिक होते पण आता ते सत्यात उतरले आहे. या विशेष फॅब्रिकद्वारे तुम्ही इतर गॅझेटही चार्ज करू शकाल. या गॅझेट्समध्ये स्मार्टफोन, स्मार्टवॉच आणि इअरबड्सचा समावेश आहे. यासाठी शास्त्रज्ञांनी त्यात 1,200 लहान फोटोव्होल्टेइक पेशी (सौर पॅनेल) वापरल्या आहेत.

यामुळेच त्याच्या आत सौर ऊर्जा चांगल्या प्रकारे साठवली जाऊ शकते. हे फॅब्रिक 400 मिलीवॅट विद्युत ऊर्जा निर्माण करण्यास सक्षम आहे, त्यामुळे तुम्ही तुमचे गॅझेट सहज चार्ज करू शकाल. सध्या या तंत्रज्ञानावर अजून काम सुरू आहे पण भविष्यात ते सर्वांसाठी उपलब्ध होईल.