DoT कडून नियमांत मोठे बदल, 18 वर्षापेक्षा कमी वय असलेल्यांसह 'या' लोकांना मिळणार नाही SIM Card
प्रतिकात्मक फोटो (Photo Credits-Facebook)

दूरसंचार विभाग (DoT) ने मोबाईल सिम कार्ड संबंधित नियमात बदल केले आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी DoT ने KYC च्या नियमांत बदल केला आहे. ज्यामुळे ग्राहकांना आता घरबसल्या मोबाईल सिम कार्ड मिळवू शकतात. त्याचसोबत सिम कार्ड अगदी सहज पोर्ट ही करता येणार आहे. अशातच आता DoT ने मोबाईल सिम कार्ड देण्यासंबंधित नियमात बदल केला असून नव्या गाइडलाइन्स जाहीर केल्या आहेत. यामध्ये सिम कार्डच्या बनावटीवर लगाम लावला जाईल. दूरसंचार विभागाने टेलिकॉम ऑपरेटर्सला सांगितले की, देशातील कोणत्याही 18 वर्षाखालील मुलाला सीम कार्ड दिले जाऊ नये. त्याचसोबत ज्या व्यक्तींची मानसिक स्थिती ठिक नाही त्यांना सुद्धा सिम कार्ड देऊ नये. असे केल्याचे आढळल्यास टेलिकॉम ऑपरेटरला दोषी मानले जाणार आहे.

Telecom Talk च्या रिपोर्ट्सनुसार, ग्राहकांना नवे सिम कार्ड घेण्यासाठी कस्टमर एक्युजिशन फॉर्म (CAF) भरावा लागणार आहे. यामध्ये कस्टमर आणि टेलिकॉम कंपन्यांच्या दरम्यान एक करार असतो. या फॉर्मच्या अंतर्गत काही नियम ही लागू करण्यात आलेले असतात. हा करार इंडियन कॉन्ट्रॅक्ट लॉ 1872 अंतर्गत लागू केला जाणार आहे. या कायद्यानुसार कोणताही कॉन्ट्रॅक्ट 18 पेक्षा अधिक वर्षादरम्यान असावा. भारतात एक व्यक्ती अधिकाधिक आपल्या नावाने 12 सिम कार्ड खरेदी करु शकतो. यामध्ये 9 सिम कार्डचा वापर कॉलिंगसाठी केला जाऊ शकतो. तर 9 सिमचा वापर मशीन-टू-मशीन कम्युनिकेशनसाठी उपयोग केला जाऊ शकतो.(Sim Card संबंधित 'या' नियमात बदल, जाणून घ्या अधिक)

DoT कडून मोबाईल सिम कार्ड घेण्यासाठी eKYC आणि Self KYC प्रक्रिया सुरु केली आहे. त्यानुसार घरबसल्या नव्या मोबाईल कनेक्शन मिळवता येणार आहे. त्याचसोबत सिम कार्ड पोर्ट करण्याची प्रक्रिया सुद्धा सोप्पी होणार आहे. यासाठी नागरिकांना 1 रुपया शुल्क द्यावा लागणार आहे.