दिवाळीचा सण काहीच दिवसांवर येऊन ठेपला असल्याने अनेकांनी खरेदीला सुरुवात केली आहे. बाजारातही तुम्हाला अनेक दुकानांमध्ये ऑफर्स व सेल पाहायला मिळतील. पण तुमची दिवाळी अजून खास व्हावी म्हणून अनेक मोठ्या ब्रँड्सनीसुद्धा यंदा काही खास ऑफर्स जाहीर केल्या आहेत. मग त्यात iPhone, Zomato तसेच BookMyShow चा ही समावेश आहे. चला तर बघूया कोणत्या ब्रँडवर आहेत काय विशेष सवलती.
1. HDFC बँकेंच्या क्रेडिट आणि डेबिट कार्डने पेमेंट करून iPhone 11 खरेदी केल्यास त्यावर 7000 रुपयांपर्यंत कॅशबॅक मिळत आहे. तसेच ही सुविधा ईएमआयवरही उपलब्ध आहे.
2. शाओमी (Xiaomi), विवो आणि ओप्पो या कंपन्यांचा फोन खरेदी केल्यास 10 टक्के कॅशबॅक आणि सॅमसंग फोनवर 15 टक्के कॅशबॅक मिळत आहे.
3. रीलायन्स डिजिटल आणि जिओ डिजिटल लाइफवर 10 टक्के कॅशबॅक मिळत आहे.
4. लेटेस्ट वनप्लस स्मार्टफोन्सवर मिळवा 3000 रुपये इन्स्टंट डिस्काउंट.
5. अनेक फूटवेअर ब्रँडवरही कॅशबॅक मिळत आहे.
6. कॉल इट स्प्रिंग, न्यू बॅलन्स आणि चार्ल्स अँड कीथ यासारख्या ब्रँड्सवर 5 टक्के कॅशबॅक मिळत आहे.
7. रीलायन्स फूटप्रिंटवरून खरेदी केल्यास 10 टक्के कॅशबॅक मिळेल.
8. झोमॅटो ऍपवरून 300 रुपयांपेक्षा अधिक रकमेचे खाद्यपदार्थ ऑनलाइन ऑर्डर केल्यास 75 रुपयांची कॅशबॅक मिळेल.
9. बिग बाजारमधून ग्रॉसरी खरेदी केल्यास 5 टक्के तत्काळ डिस्काउंट मिळेल.
10. डी मार्टमधून खरेदी केल्यास 5 टक्के कॅशबॅक मिळेल.
11. रिलायन्स फ्रेश आणि रिलायन्स मार्केटमधून खरेदी केल्यास 10 टक्के कॅशबॅक मिळेल.
12. बिग बास्केटमधून खरेदी केल्यास 15 टक्के तत्काळ डिस्काउंट मिळेल.
13. ग्रोफर्समधून खरेदी केल्यास 250 रुपयांपर्यंत तत्काळ डिस्काउंट मिळेल.
14. बुक माय शो (BookMyShow) आणि आयनॉक्स (INOX) मध्ये HDFC बँकेच्या कार्डवरून कमीत कमी दोन तिकीटं बुक केल्यास 100 रुपयांची सूट मिळेल.